माळी समाजाचे प्रतिनिधी विधानसभेत पाठवा माळी हक्क परिषदेत ठराव

    भुसावळ  (प्रतिनिधी ) - महाराष्ट्रात माळी समाजाचे प्रमाण अधिक असून माळी समाजाचे जास्तीत जास्त प्रतिनिधी विधानसभेत पाठवावे असा ठराव भुसावळ माळी भवन संपन्न झालेल्या माळी हक्क परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आला आहे .

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जामोद चे माजी आमदार कृष्णकांत इंगळे , उत्तमराव महाजन, विजय महाजन ,गुलाबराव वाघ , ज्ञानेश्वर महाजन पद्माकर महाजन, वासु नरवाडे ,श्रीमती गुरुनुले , वंदना तिखे आदी मान्यवर उपस्थित होते .

याप्रसंगी मान्यवरांनी सांगितले की ज्या राजकिय पक्षाने माळी समाजाचे उमेदवार दिले त्या पक्षाच्या पाठीशी माळी समाज उभा राहणार आहे .
तसेच त्या उमेदवारास निवडून आणण्याचे कार्य माळी समाज हक्क परिषद करणार आहे .
आम्ही सर्व पक्षाकडे माळी समाजाचा उमेदवार देण्यासाठी मागणी करणार आहोत .
यापूर्वी माळी समाजाच्या अनेक आमदारांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे ,परंतु मागील काही वर्षापासून माळी समाजाचे फारच कमी आमदार विधानसभेत जात आहे ही शोकांतिका आहे ,आपण कोठेतरी विभागले गेलो आहोत यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे .
अध्यक्षीय भाषणात अविनाश ठाकरे यांनी सांगितले की माळी समाजाचे जास्तीत जास्त आमदार प्रतिनिधी विधान सभेत पाठवण्याचे काम हे आपल्या सर्व समाजबांधवाचे आहे .
समाज बांधवांनी महाराष्ट्रभर एकजूट करून हा प्रयत्न करणे गरजेचे आहे सोशल मीडिया च्या आधारे समाज जोडा .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कांडेलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन गजेंद्र महाजन यांनी केले .
या कार्यक्रमात महाराष्ट्र भरातून शेगाव , जळगाव , धरणगाव , चंद्रपूर ,संभाजीनगर , पुणे, अमरावती ‘ एरंडोल ,पंढरपूर , यवतमाळ , हिंगोली, अमरावती, अकोला, जामनेर आदी शहरातून माळी समाजाचे दोनशे प्रतिनिधी उपस्थीत होते .
कार्यक्रमाचे आयोजक कैलास महाजन , संतोष इंगळे व राजेंद्र महाजन हे होते .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी माळी समाज हक्क परिषदेचे संतोष माळी , सुभाष महाजन , सारंगधर माळी , पवन माळी , धनंजय महाजन , चंद्रकांत भुजबळ , अण्णा गायकवाड ,शैलेश माळी , संजू माळी , दशरथ महाजन , भरत माळी , दीपक जगताप , बाळू चौरे ,सारंगधर माळी ,निवृत्ती महाजन ,नवनाथ जाधव , शंकरराव वाघमारे , भरत माळी ,वर्षाताई लोणबले ,वसंत पाटील ,प्रशांत लांडे , देविदास उमप, ईश्वर माळी ,डी एन महाजन व समाज बांधवांनी परिश्रम घेतले .