संतांचे चरित्र वाचा व जीवनात प्रगती करा सुनील वानखेडे ; श्री संत रविदास महाराज फिरती व्याख्यानमाला संपन्न:


भुसावळ
भविष्यकाळाचा फक्त आपण विचार करू शकतो वर्तमान काळात तुम्हाला संभ्रमित होऊन वेळ वाया जातो परंतु भूतकाळाचा विचार केला तर अनेक गोष्टी वाचण्यास व समजण्यास मिळतात संत रविदासांनी पुरातन काळामध्ये कोणत्याही सुविधा उपलब्ध नसताना दूरदृष्टी ठेवून समाजातील विषमता दूर होण्यासाठी दोह्यांची रचना केली या माध्यमातून समाजातील तळागाळातील रंजलेल्या गांजलेल्या समाजाचे परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या संत साहित्याचे वाचन केल्यास विद्यार्थ्यांना प्रगतीचा मार्ग मिळतो याकरिता संतांची चरित्र वाचले पाहिजे असे मत सुनील वानखेडे यांनी व्यक्त केले
खडका ता. भुसावळ येथील ज्ञानज्योती माध्यमिक विद्यालय येथे श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त फिरत्या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता आर आर बावस्कर होते या कार्यक्रमाचे वक्ते एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट चे व्हाइस चेअरमन सुनील वानखेडे होते यावेळी माध्यमिक शिक्षक पतपेढीचे माजी संचालक डॉ. संजीव भटकर जेष्ठ समाजसेवक सी एस सपकाळे एन एस भिरुड, आर एस अंबलकर, चेतना धांडे अश्विनी सरोदे पूजा भोळे शितल भोळे आदी मान्यवर उपस्थित होते

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत रविदास व स्काऊट गाईडचे संस्थापक बेडन पावेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. संजीव भटकर म्हणाले की संत रविदासांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे व त्या विचारांच्या माध्यमातून स्वतःची प्रगती साधता आली पाहिजे यासाठी संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त चार दिवसीय फिरती व्याख्यान आयोजित करण्यात आली आहे
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ते सुनील वानखेडे यांनी संत रविदास व आजचे विद्यार्थी या विषयावर बोलताना म्हणाले की तळागाळातील व रंगलेल्या गांजलेल्या लोकांसाठी समजेल या भाषेतून ज्ञानाचे भांडार उघडे केले दैनंदिन जीवन जगत असताना संत रविदास ज्याप्रमाणे दररोज पोटाला मिळेल एवढेच कमवत व उर्वरित एक बूट जोडी गरजवंताला भेट देत असत यावरून आपण समाजात वावरत असताना आपल्या उत्पन्नाच्या दहा टक्के भाग हा समाजासाठी खर्च केला पाहिजे गरजवंताला दिला पाहिजे यामुळे काही प्रमाणात विषमता दूर होण्यासाठी मदत होईल तसेच समाजात वावरत असताना उच्च नीच गरिबी श्रीमंत असा भेद करू नये तसेच जे काही कराल ते प्रामाणिकपणे करावे तोच संदेश घेऊन विद्यार्थिनी अभ्यासात प्रगती करावी ज्ञान मिळवावे व कुटुंबासोबतच समाज गाव व देशाचे नाव उज्वल करावे संत रविदासांची चरित्र वाचल्याने आपल्याला भविष्यातील मार्गक्रमणाचा मार्ग मिळत असल्याचे यावेळी सांगितले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी सरोदे यांनी तर आभार ज्योती कांबळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतीसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

स्वतः विचार करा व मार्गक्रमण सुरू ठेवा आर आर बावस्कर
प्रतिनिधी वरणगाव
महाराष्ट्रात थोर संत पुरुष होऊन गेले त्यांचे विचार वाचले पाहिजेत त्या विचारांवरती मार्गक्रमण केले पाहिजे विद्यार्थ्यांना संतांचे विचार व आचार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आचरणात आणली पाहिजे यामुळे प्रगती होऊन यशाची दारे उघडतात मात्र यासाठी स्वतः विचार करून त्यावर मार्गक्रमण केले पाहिजे असे प्रतिपादन दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता आर आर बावस्कर यांनी केले

तिसरे पुष्प बोहर्डीला
या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प नेहरू विद्यामंदिर तळवेल येथे बुधवारी झाले या ठिकाणी डॉ. संजीव भटकर यांनी विद्यार्थ्यांना संत रविदास यांचे विचार व्याख्यानातून सांगितले तर शुक्रवारी अरुणोदय माध्यमिक विद्यालय बोहर्डी ता. भुसावळ येथे या व्याख्यानमालेची तिसरे पुष्प गुंफले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल जगताप होते तर प्रमुख अतिथी सी एस सपकाळे व वक्ते धनराज मोतीराय हे गुरु रविदासांचे वैज्ञानिक भूमिका या विषयावर विचार व्यक्त केले