वरणगाव – भारतीय जनता पार्टीच्या वतीने गाव चलो घर चलो अभियान राबविण्यात येत असून जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत 21 बुथला भेट देत नागरिकाना सरकारच्या नवीन योजनेची माहिती दिली .

यावेळी त्यांनी सरकारने भारतात केलेल्या सर्वागीन विकास जनते समोर पाडला अनेक गोरगरीब जनतेच्या हिताची कल्याणकारी योजना राबविण्यात येत असुन याचा फायदा मोठया प्रमाणात होत असल्याचे सांगत पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांनी कधीही जात धर्म न बघता सरसकट योजना सामान्य जनते पर्यंत पोहोचविल्या असल्याचे त्यांनी बैठकीत सांगून येत्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला मोठया प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले
यावेळी सुनिल काळे , परिक्षित बऱ्हाटे , शे अखलाक शे युसुफ , सुनिल माळी , ए जी जजाळे , प्रविण चादणे , छोटू सेवतकर , अल्लाउद्दीन शेठ , प्रणिती पाटील , रुख्मीणीबाई काळे , कुंदन माळी , सुशील झोपे , नामदेव मोरे , एकनाथ पहेलवान यांच्यासह मोठया संख्येने भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते



