मकर संक्रांतीचे भौगोलिक महत्त्व -प्र.ह.दलाल ; (प्रासंगिक लेख )

.मकर संक्रांत हा इंग्रजी कॅलेंडर नुसार सुरू होणाऱ्या नव वर्षातील पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारीत येणारा हिंदूंचा पहिलाच मोठा सण ! हिंदू कालगणनेनुसार पौष महिन्यातील शुक्ल पक्षात हा सण येतो. आपण त्यास सण म्हणत असलो तरी तो केवळ अध्यात्मिक सण नाही,तर भौगोलिक व वैज्ञानिक दृष्ट्या ही संपूर्ण मानव जातीसाठी आगळे वेगळे महत्त्व असणारा महत्त्वपूर्ण सण आहे….. सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत होणाऱ्या संक्रमणा ला संक्रांती असे म्हणतात राशी बारा आहेत प्रत्येक राशीत सूर्याचे संक्रमण होते त्या अर्थाने वर्षभरात बारा संक्रांती येतात .मात्र ज्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांत असे म्हणतात…..राशी म्हणजे काय?…आपली पृथ्वी सूर्याभोवती वर्तुळाकार मार्गाने भ्रमण करते.त्या काल्पनिक मार्गाला क्रांतिवृत्त असे म्हणतात.त्या मार्गाचे(वर्तुळाचे)३६०अंशाचे समान बारा भाग (प्रत्येकी ३०अंश) केल्यास त्या प्रत्येक भागाला एक रास म्हणतात.अश्या प्रकारे मेष पासून मीन पर्यंत बारा राशी होतात .ग्रह,नक्षत्र जसे आकाशात दिसतात तश्या राशी दिसत नाही.नक्षत्र समूहाच्या दिसणाऱ्या भासमान आकृतीनुसर राशी ना नावे दिली आहेत.उदा.आकाशात विंचवा सारखे जे दिसते त्या त्यास वृश्चिक रास तर धनुष्य सारखी आकृती दिसणाऱ्या नक्षत्र समूहाला धनू रा स म्हणतात…..सामान्यपणे सूर्य सर्वच राशीतून भ्रमण करीत असतो.पण कर्क व मकर राशीतील सूर्याचे संक्रमण विशेष महत्वपूर्ण मानले जाते.हे संक्रमण सहा सहा महिन्याच्या अंतराने होते त्यालाच सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन असे भौगोलिक नावे आहेत.भारतीय सौर कालगणना नुसार १पौष व इंग्रजी(ग्रेगोनियान) कालगणना नुसार २२डिसेबर रोजी सूर्याचे उत्तरायण सुरू होते. वर्षाच्या १२महिण्यापैकी सहा महिने सूर्य उत्तर गोलार्धात जास्तीत जास्त झुकलेला असतो तर सहा महिने दक्षिण गोलार्धात….. मकर संक्रांती पूर्वी सूर्य दक्षिण गोलार्धात जास्तीत जास्त झुकलेला असतो म्हणजेच उत्तर गोलार्धा पासून लांब असतो .परिणामतः उत्तर गोलार्धात सूर्याचा प्रकाश व उष्णता कमी मिळतो दिवस लहान रात्र मोठी असते.म्हणजेच थंडी जास्त म्हणून हिवाळा असतो.आपला भारत देश उत्तर गोलार्धात आहे……मकर संक्रांती पासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते.परिणामतः सूर्य प्रकाश व उष्णता वाढू लागते दिवस मोठा व रात्र लहान होते म्हणजेच हिवाळा संपून उन्हाळा सुरू होतो ऋतुराज वसंताचे आगमन होणार म्हणून साऱ्या चराचरात नव चैतन्य संचारते यालाच प्रकाशपर्व असेही म्हणतात …….सर्व सजीव सृष्टी उत्साह,व कार्यशक्ती त वाढ होते जगातील जवळ जवळ ८०टक्के लोकसंख्या उत्तर गोलार्धात राहते म्हणूनच मकर संक्रांत हा केवळ धार्मिक सण नाही तसेच तो फक्त भारतीय लोकांसाठीच नाही तर जगातील सर्व मानव जाती साठी उत्साहवर्धक अशी एक भौगोलिक घटना आहे तमसो मा ज्योतिर्गमय असा उदघोष करून सूर्याची आराधना करून सर्वे भवंतू सुखिन .. अशी साऱ्या विश्वाचे कल्याणासाठी तेजाची प्रार्थना करणाऱ्या भारतीय संस्कृतीने अध्यात्माला वैज्ञानिक व भौगोलिक जोड देवून आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे .ही आपल्या दृष्टीने किती अभिमानाची व आनंदाची बाब आहे नाही का? ह्या दिवशी तीळ व गूळ एकमेकांना देण्यामागे आरोग्य वर्धन हा विज्ञानाने मान्य केलेला विचार आहे त्याबद्दल आपण सर्व चांगले जाणतात म्हणून विस्तार भया स्तव ते लिहिण्याचे टाळतो असो तीळ गूळ घ्या अन् राग,चुका विसरुन गोड गोड बोलत रहा हीच विनंती.