गुरांचा अपघात रोखण्यासाठी भुसावळ विभागात मोहीम :



भुसावळ – गुरांचा (प्राणी) अपघात हा भारतीय रेल्वेचा प्रमुख चिंताजनक एक विषय आहे. गुरे रेल्वे खाली चिरडण्याच्या अपघाता मुळे केवळ समय पालन पण नुकसान होते आणि रेल्वे मालमत्तेचे पण नुकसान होते आणि रेल्वे प्रवासी लोकांची सुरक्षा देखील धोक्यात येते. चालू वर्षात भुसावळ मंडलात एकूण 112 CRO ( Cattle Run Over) गुन्हे दाखल झाले आहेत. रेल्वेची चिंताजनक परिस्थिती लक्षात घेता, महाप्रबंधक/मध्य रेल यांनी १५ दिवस सघन अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार दिनांक १५.१२.२०२३ ते २९.१२.२०२३ या कालावधीत भुसावळ विभागात धडक मोहीम सुरू करण्यात आली. मोहिमेदरम्यान, ज्या ठिकाणी गुरे रुळांवर चिरडण्याची शक्यता आहे आणि CRO च्या कारणे यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. विश्लेषणानंतर, भुसावळ विभागात CRO ची एकूण 64 संवेदनशील ठिकाणे ओळखण्यात आली आहेत. CRO चे एक मुख्य कारण म्हणजे पॅन्ट्रीकार/OBHS कर्मचारी, रेल्वे यात्री आणि स्थानीय रहिवाशांकडून रेल्वे रुळां जवळ कचरा टाकणे. उपाय योजना साठी 10 ठिकाणी सीमा/कुंपण ( Boundary Wall) बांधण्यात आले असून 5 ठिकाणी सीमा भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. उर्वरित ठिकाणीही हद्दवाढीचे (Boundary Wall) काम प्रस्तावित असून ते प्रगतीपथावर आहे. उक्त अभियान RPF/अभियांत्रिकी विभागाद्वारे संयुक्तपणे करण्यात आले. या अभियानात एकूण ५५५१ जणांना ताकीद देण्यात आली, ५३० पशुपालकांना नोटीस बजावण्यात आली, रेल्वेच्या जमिनीत गुरे चरणाऱ्यांवर रेल्वे कायद्यान्वये 57 गुन्हे दाखल करण्यात आले. या संदर्भात श्रीमती इति पांडे, मण्डल रेल प्रबन्धक/भुसावळ यांनी लोकांना आवाहन केली की, ट्रॅकजवळ व रेल्वेच्या जमिनीवर कचरा, खाद्यपदार्थ आदि टाकू नये, जेणे करून पशु रेल्वे लाइन जवळ येणार नहीं आणि रेल्वेच्या जमिनीवर/रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला गुरे चरणे टाळावे जेणेकरून मोठे अपघात टाळता येतील.