डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा.-अ.फ.भालेराव.


मुक्ताईनगर-अतिशय प्रतिकूल परिस्थितीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेऊन सामाजिक क्रांती घडून आणली .आणि जगात सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून आदर्श विद्यार्थी अशी ओळख निर्माण केली. त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा .असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अ.फ.भालेराव यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील नवीन माध्यमिक विद्यालय सुकडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये प्रमुख वक्ते म्हणून केले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप दाने होते .कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद बोदडेयांनी केले .याप्रसंगी डॉ.अ.फ. भालेराव म्हणाले की महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला महान असा संविधान हा ग्रंथ बहाल केला .ज्यामधून स्री- पुरुष समानता गरीब- श्रीमंत लहान-मोठा विषमता नष्ट झाली .भेदभाव नष्ट करून देशात समता प्रस्थापित केली. सर्वांना न्याय स्वातंत्र्य हक्क कर्तव्य अधिकार बहाल केले. हे सर्व त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने सिद्ध करून दाखविले .जिद्द आत्मविश्वास व कठोर परिश्रमाने निश्चित ध्येय साध्य करता येऊ शकते .हा विश्वास बाबासाहेबांनी निर्माण केला. हा संदेश आज विद्यार्थ्यांनीआत्मसात करावा .असे आवाहन अ.फ .भालेराव यांनी केले.
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक प्रदीप दाने म्हणाले की बाबासाहेब थोर समाजसेवक होते .तसेच ते थोर राष्ट्रभक्त होते. त्यांना एका चौकटीत बंदिस्त करून संकुचित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले .भारत देशावर बाबासाहेबांचे प्रचंड उपकार आहेत .असेही त्यांनी सांगितले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षिका वैशाली सोनवणे राजेंद्र वाघ विशाल काकडे मंगेश दांडगे संदीप पावरा मयूर सपकाळे अनिल चौधरी यांनी परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक शरद चौधरी यांनी केले तर आभार उपशिक्षक दत्तात्रय फेगडे यांनी मानले.