भुसावळ –
संपूर्ण काळोखावर आपल्या उजळत्या प्रकाशाने मात करून आपल्या सर्वांचे आयुष्य सुखं, शांती, निरोगी आणि आनंदी करणारा सण म्हणजेच दिवाळी. या सणाची आणि यावेळी मिळणाऱ्या सुट्टीची आपण सर्वच आतुरतेने वात पाहत असतो. या सुट्टीत प्रत्येक व्यक्ती आप आपल्या गावाकडे जाणे किंवा कुठेतरी फिरायला जाणे यांस प्राधान्य देतात.
पण भुसावळ शहरामधील “महाराणा प्रताप विद्यालयाचे ” माजी विद्यार्थी (वर्ष – २००२) यांनी “माझी मैत्री माझी जवाबदारी” या एका आगळा वेगळा कार्यक्रम आयोजन यंदाही
केले होते. या विद्यार्थ्यांचे हे ४ थे वर्ष होते
या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनात हरवलेला जुना मित्र व परिवार एकत्र यावे आणि त्यातून जुन्या आठवणींना उजाळा देत आयुष्याची डाऊन झालेली बॅटरी पुन्हा चार्जिंग करणे. तसेच वेग वेगळ्या गावात आणि क्षेत्रात स्थायिक झालेले मित्र यांना एकत्रीत आणून पुढील आयुष्यास काही नवीन कल्पना मिळाव्या. इतकेच नाही तर मित्रांना योग्यते सहकार्य मिळावे जेणे करून सर्वांना आयुष्यात पुढे जाण्यास मदत होईल.
या कार्यक्रमाचे आयोजन “महाराणा प्रताप विद्यलाय” (सकाळी ११ वाजता) येथे करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यास शाळेचे मुख्याध्यापक तसेच इतर शिक्षक एतर कर्मचारी वर्ग यांनी परिपूर्ण अशी मदत केली. यावेळी ” सुरेश शिंदे सर”, ” नारायण घोडके सर”, ” मधुकर वाणी सर”, ” प्रकाश चौधरी सर” आणि ” सोंनसले काका” यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभले.
मागील तीन वर्षांपासून नचुकता शाळेतील माझी विद्यार्थी एकत्रीतपणें या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. यावेळेस देखील तब्बल चाळीस माझी विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणें कार्यक्रमात सहभाग नोंदविला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक आठवणींचा ठेवा सोबत रहावा या उद्देशाने ” स्वामी विवेकानंद” यांची सुंदर अशी मूर्ती यावेळेस शाळेस भेट म्हणून दिली आणि तसेच जमलेल्या विद्यार्थ्यांना स्मुर्तीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
तद्नंतर सर्वांनी चविष्ट अश्या भोजनाचा एकत्रतीतपणें आस्वाद घेऊन शेवटी आनंदाने अत्यंत खेळीमेळीने पुढील वर्षी “मी पुन्हा येणारं” या भावनेने एकमेकांचा निरोप घेतला.
सर सूत्रसंचालन स्वप्नील सुतार, सागर विसपुते, संदीप चौधरी, प्रवीण पाटील, योगेश सरोदे यांनी केले आणि आभार स्वप्नील सुतार यांनी मानले .



