भुसावळ – येथे बुधवार दि. १५ नोव्हेंबर रोजी ब्राह्मण संघ व नुपूर कथक डान्स अँकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मण संघाच्या सभागृहात दिवाळी पहाट या शास्त्रीय व उपशास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन सकाळी सात वाजता करण्यात आले. सर्व प्रथम ब्राह्मण संघाचे अध्यक्ष विजय जोशी, दिलीप मांडळकर, दिलीप ओक , चारू भालेराव, प्रशांत पाथरकर या मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन आणि नटराज पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक करतांना विजय जोशी यांनी शताब्दी वर्षानिमित्त नियोजित कार्यक्रमांची व ब्राह्मण संघाच्या उपक्रमाची माहिती देत उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या नंतर नृत्याच्या सादरीकरणास सुरुवात झाली. सुरुवातीला नुपूर भालेराव हिने गणेश स्तुती नृत्यातून सादर करून वातावरण निर्मिती केली. यानंतर महालक्ष्मी अष्टक या वर शांभवी निनावे,वैभवी गडे, शानवी चौधरी यांनी नृत्य सादर केले. तर स्वागत नृत्य जेसिका आणि यज्ञा पाटील यांनी सादर केले. शुभं कुरुद्वं कल्यानम या संस्कृत गीतावर नक्षत्रा महाले,वृषाली लांडगे,मानवी नारखेडे , मानवी पवार, तनिष्का चौधरी,भार्गवी उंबरकर यांनी सादरीकरण केले.नंतर नुपूर भालेराव हिने त्रितालातील देस रागातील तरणा कथक नृत्य सादर केले. या नंतर कथक मधून तोडे,तुकडे, आमद,परण,परमेलू,चक्रादर तोडे, तिहाई,गणेश परन हे प्रकार कथक नृत्यातून स्वराली सपकाळे, किंजल बाऱ्हे व लतिका श्रीखंडे सादर केले. नृत्यशिक्षिका चारू भालेराव यांनी रामस्तुती सादर केली. प्रचिती कुलकर्णी हिने कथक नृत्य सादर केले. नुपूर भालेराव हिने उपशास्त्रीय प्रकारातील गीतावर नृत्य सादर केले. भरी भरी मटकी जल सो या गीतावर किंजल बाऱ्हे हिने सादर केले. अरूनी किरणी हा कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील तराना लतिका श्रीखंडे हिने सादर केला. कार्तिक महिन्यात दिवाळी आली या गाण्यावर उपशास्त्रिय प्रकारातील नृत्य मालती श्रीखंडे,मंजू शर्मा, दिपाली पाटील, यशश्री पाटील, माधवी गडे आणि जयश्री पाटील यांनी सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी सर्व कलावंतांनी लख लखं चंदेरी तेजाची या गाण्यावर दिपनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाला रसिकांचं उस्फुर्त प्रतिसाद लाभला. मालती श्रीखंडे यांनी साकारलेली रांगोळी लक्ष वेधून घेत होती.राजेश्री देशमुख यांचे सूत्रसंचालन लक्ष वेधून घेत होते. आभार रमाकांत भालेराव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कार्यकारिणी सदस्य तसेच अशोक पाटील, शाम महुरकर यांनी परिश्रम घेतले.







