भुसावळ – बकर्यांच्या नावाखाली कत्तलीसाठी नेणाऱ्या वासरांची बेकादेशीरपणे वाहतूक थांबवावी यासाठी आज प्रांताधिकार्यांना भुसावळ येथील समस्त गोरक्षक प्रेमी यांनी निवेदन दिले .
यात नमूद आहे की , गुरुवार रोजी मध्यरात्री 11 वाजेच्या सुमारास महामार्गावरील निको बॅटरी दुकानाच्या पुढे मारुती बोअरिंग जवळ पांढर्या रंगाचे पिकअप वाहनात अज्ञात नराधम काही गोवंश कोंबून भरत होते, तेव्हा तेथून जाणार्या काही नागरिकांनी त्यांना विचारणा करण्यासाठी थांबविले असता ते त्या नागरिकांना धारधार हत्यार दाखवून पळून गेले.
या प्रकारात 3 लहान वासरांना वाचविण्यात यश आले.
बकरीच्या नावाखाली गोवंश तस्करी करणारे वाहन जप्त करुन त्या नराधमां विरुद्ध गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करावी मागणी केली आहे.

यावेळी गोरक्षक प्राणी मित्र रोहित महाले , राजू पाटील ,किशोर खलसे, हेमंत हजारे , खुशवंत सोनवणे , कुणाल पाली, तेजस साळी, बल्लू धायडे ,आदित्य चौधरी , मयूर सावकारे , हिमांशू काळे , राज खर्चे आदी उपस्थित होते .


