,

भुसावळ– – भुसावळ तालुक्यातील वाघुर धरणाला संत तोताराम महाराजांचे नाव द्या अशी मागणी येेथील साई निर्मल फाउंडेशनचे नमो विचार मंच अध्यक्ष क्षत्रिय लेवा ब्रिगेड महाराष्ट्र शिशिर डी जावळे यांनी केली असून याबाबत उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री फडवणीसांकडे मागणी निवेदन यांना पाठविले आहे .
देशातील वैकुंठवासी हरिभक्त परायण संत श्रेष्ठ परमपूज्य तोताराम महाराज गाडेगाव कर यांनी वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारासाठी स्वतःच्या संपत्तीचा ऐश्वर्याचा त्याग करून वैष्णव पांथासाठी स्वतःच संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांनी केलेले कार्य हे शब्दात प्रकट केले जाऊ शकत नाही . त्यांनी संपूर्ण खानदेशामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करून घराघरांमध्ये वारकरी संप्रदाय पोहोचविला.अशा या थोर संतांच्या प्रति आदरभाव व्यक्त करणे व त्यांचे कार्य अखंड मानवत जातीला समजावून देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे म्हणून महाराजांच्या प्रति मानसन्मान व आदरभाव व्यक्त करण्यासाठी या थोर संताचे नाव(वै.ह. भ. प. संत श्रेष्ठ तोताराम महाराज गा डेगावकर धरण)आपल्या जामनेर तालुका जिल्हा जळगाव महाराष्ट्रातील वाघुर धरणास देऊन संपूर्ण वारकरी संप्रदायास व लेवा समाजास उपकृत करावे. अशा आशयाचे मागणी असलेले निवेदन त्यांनी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


