भुसावळ- येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त सर्वासाठी योगासनाचे आयोजन करण्यात आले . यावेळी भुसावळ केंद्राच्या मुख्य प्रशासिका बी के सिंधू दिदी यांची तब्येत बरी नसल्याने त्यांचा संदेश ब्रह्माकुमारी ज्योती दिदी यांनी जीवनात योगाचे महत्त्व स्पष्ट करतांना सांगितले की,’ तन (शरीर) स्वस्थ असेल तर मन ही स्वस्थ असू शकते पण जर मन प्रसन्न असेल तर तन (शरीर) आपोआपच स्वस्थ व्हायला लागते. आणि मनाला स्वस्थ आणि सुदृढ ठेवण्यासाठी मनाला व्यर्थ विचारांपासून दूर ठेवता आले पाहिजे त्यासाठी राजयोग मेडिटेशन अर्थातच ध्यान (योग) शिकणे आवश्यक आहे. , ‘ योग: चित्त-वृत्ति निरोध:’ अर्थात योग चंचल वृत्ती समाप्त करून ईश्वराशी एकरूप होण्याचे साधन किंवा माध्यम आहे. ईश्वराशी एकाग्रचित्ताने एकरूप झाल्यास मनाची अवस्था सतोगुणी होणास मदत होते, विचार करण्याची शैली बदलते, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुधारतो, आत्मबळ वाढायला लागते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अध्यात्मिक भाषेत आपण स्थितप्रज्ञ अवस्थेकडे जाऊ शकतो जी परम उच्च कोटीची अवस्था आपल्याला राजयोगा द्वारे प्राप्त होउ शकते. योगासने केल्याने आपल्याला शारीरिक फायदा निश्चितच होतो पण मनाला बळकट बनवण्यासाठी किंवा आत्मबल वाढवण्यासाठी राजयोग मेडिटेशन म्हणजेच ध्यान अती आवश्यक आहे, यानिमित्ताने त्यांनी सर्वांनाच निशुल्क राजयोग शिकण्यासाठी भुसावळ केंद्राला भेट देण्याचे आवाहन केले.

अहिल्यादेवी कन्या विद्यालयाचे योगशिक्षक नाना पाटील सर यांनी योगाचे जीवनातील स्थान व योगाचे महत्त्व व फायदे याविषयी माहिती दिली. यानंतर ब्रम्हाकुमारी केंद्रातील सर्व बांधव व बहीनी आलेल्या विविध शाळेतील विदयार्थी व शिक्षकांनी योगासन कार्यक्रमांत सहभाग घेतला. योग शिक्षक नाना पाटील यांनी योगासने कपाळभाती,प्राणायम, ध्यान धारण, काही पूरक हालचाली दंड स्थितीतील आसने ताडासन, वृक्षासन, पादा- हस्तासन,अर्ध चक्रासन, त्रिकोणासन तसेच मकरासन, भुजंगासन इ.पोटावर झोपून करावयाची आसने तसेच बैठक स्थितीतील आसने दंडासन,भद्रासन, वज्रासन,वक्रासन इ.आसने त्यांनी घेतली प्राणायम व योगासने करतांना सुद्धा कोणती काळजी घ्यावी यांचे ही मार्गदर्शन त्यांनी केले . यावेळी संगीताच्या तालावरही जॉगीग करण्यात आली .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित शिक्षक व काही मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले सूत्रसंचालन दिपा दीदी प्रास्ताविक ज्योती दीदी यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना केंद्रातर्फे प्रमाणपत्र देण्यात आले तसेच सौ सोनाली वास्कर श्री नितीन धुंदे योग शिक्षक नाना पाटील सर यांचे यावेळी सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बी.के ज्योती दीदी ,दीपा दिदी, अनिल कुकरेजा दिलीप नितीन रघुनाथ श्रीराम तसेच इतर सर्व बंधू भगिनी आदींनी परिश्रम घेतले.


