वरणगावातील भाजपच्या काळातील साडे तेरा कोटींच्या निकृष्ट पाईप लाईनमुळेच हजारो लिटर पाण्याची नासाडी ; गावकऱ्यांना पाण्यासाठी राहावे लागते वंचित :

  • सिद्धेश्वर नगरच्या फिल्टर हाऊसमधून टाकलेली पाईप लाईन जागोजागी फुटून शुद्ध पाण्याचा तलाव साचला
  • ‘मविआ’च्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वास्तव आणले समोर

भुसावळ – वरणगाव येथील ग्रा. पं. वर भारतीय जनता पार्टीच्या तत्कालीन कार्यकाळात साडे तेरा कोटींच्या पाणी पुरवठा योजनेतून टाकलेली पाईप लाईन अतिशय निकृष्ट आणि वेळी वाकळी टाकून सिद्धेश्वर नगर येथील फिल्टर हाऊस येथून गावात येणारी फिल्टर केलेले पाण्याची पाईप लाईन अनेक ठिकाणी फुटून तसेच व्हालव्हला गळती लागून दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे आज प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यामुळेच वरणगाकराना 12 ते 15 दिवसांनतर पाणी मिळत असल्याचे पाप भाजपचे असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांनी केला आहे.

वरणगाव शहरातील नागरिकांना उन्हाळ्यात 12 ते 15 दिवसानंतर पाण्यावाचून वंचित राहावे लागत आहे. आज सोमवारी महाविकास आघाडीचे शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष माळी, निलेश ठाकूर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष समाधान चौधरी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अशफाक काझी आणि शिवसैनिकांनी प्रत्यक्ष सिद्धेश्वर नगर येथील फिल्टर हाऊसमधून टाकण्यात आलेली पाईप लाईनची पाहणी केली असता त्या ठिकाणी व्हालव्ह आणि पाईप लाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागून अनेक ठिकाणी पाणी साचून तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी समोर आले आहे.

वरणगावमध्ये ग्रामपंचायतच्या काळात तात्कालीन भाजपची सत्ता होती. तेव्हा साडे तेरा कोटीच्या पाणी पुरवठा योजनेमधून सिद्धेश्वर नगर येथे फिल्टर हाऊस आणि तिथून फिल्टर केलेले पाणी पुन्हा गावातील नागरिकांना पिण्यासाठी पाईप लाईन टाकण्यात आलेली आहे. या पाईप लाईनला नागेश्वर रोडवरील इंगळे सर यांच्या घरा समोर रेल्वे लाईनच्या पलीकडे व्हालव्ह आणि पाईप लाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागून तलाव सदृश्य स्तिथी निर्माण झाली आहे.

  • ये पब्लिक है सब जानती है

तत्कालीन भाजपच्या कार्यकाळात साडेतेरा कोटीच्या पाईप लाईन उत्कृष्ट दर्जाची केली असती तर आज वरणगावकऱ्यांना पाण्यासाठी दहा ते पंधरा दिवस वंचित राहावे लागले नसते. स्वतःचे पाप झाकण्यासाठी वरणगावातील भाजपवाले चमकोगिरी मोर्चा आंदोलन करून वरणगावकरांची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. मात्र वरणगवातील माय बाप जनता सुज्ञ असून त्यांना सर्व माहित आहे, ये पब्लिक है सब जानती है…

यावेळी सिद्धेश्वर नगर येथुन फिल्टर झालेल्या पाण्याची पाईप लाईन आणि व्हालव्हची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडीचे शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष माळी निलेश ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शाराध्यक्ष समाधान चौधरी आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष अशफाक काझी तसेच शिवसेनेचे तालुका अल्पसंख्यांक संघटक मोहसीन खान, जेष्ठ शिवसैनिक बाळू माळी, उमाकांत झांबरे, निलेश काळे, यशवंत बढे, विकी मोरे आदी शिवसैनिक उपस्थित होते.