वरणगाव शिवसेनेतर्फे दिशादर्शक फलकाचे अनावरण : फलक नसल्यामुळे प्रवासी निघून जायचे पुढे; प्रवाशांनी केली होती मागणी :

भुसावळ – नवीन उड्डाणपूल झाल्यामुळे वरणगावला येण्यासाठी फुलगाव येथून डाव्या साईडला वडून यावे लागते. परंतु याठिकाणी वरणगावचा दिशादर्शक फलक नसल्यामुळे नवीन प्रवासी मुक्ताईनगरकडे निघून जात होते. या ठिकाणी दिशादर्शक फलक लावावा अशी मागणी प्रवाशांनी शिवसेनेकडे केल्यामुळे आज 8 मे रविवार रोजी विश्वासदर्शक फलकाचे अनावरण जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. तरसोद ते चिखली नवीन महामार्ग झाल्यामुळे वरणगाव जवळील फुलगाव येथून रेल्वे लाईनवर दीड कि. मी. चा उड्डाणपूल बांधण्यात आल्यामुळे वरणगाव शहर एका साईडला पडले. भुसावळ कडून वरणगावला येण्यासाठी फुलगाव येथून उड्डाणपूल लागण्याच्या आधी प्रवाशांना डाव्या साईडला वळावे लागते. वरणगावसह परिसरातील नागरिकांना फुलगाव जवडून वरणगावला जाण्याचा मार्ग माहित होता. परंतु दिशादर्शक फलक नसल्यामुळे नवीन प्रवासी भुसावळकडून वरणगावला फुलगाव कडून न जाता थेट उड्डाणपूल चढून पुढे निघून जायचा. ही बाब प्रवाशांनी शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी यांच्याकडे मांडली. त्या अनुषंगाने संतोष माळी यांनी स्वतः पदरमोड करून फुलगाव उड्डाणपुलाजवळ दिशादर्शक फलक लावून त्याचे अनावरण जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा संघटक विलास मुळे, शहरप्रमुख संतोष माळी, निलेश ठाकूर, मुस्लिम समाजाचे नेते सय्यद जाफरअली उर्फ हिपी शेठ, उपशहर प्रमुख सुखदेव धनगर, राम शेटे, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, आबा सोनार, शहर संघटक पंकज चौधरी, भुसावळ तालुका अल्पसंख्यांक संघटक मोहसीन खान, युवा जिल्हाधिकारी चंद्रकांत शर्मा, माजी ग्रामपंचायत सदस्य विलास वंजारी, शिवा भोई, माजी उपशहर प्रमुख सुनील भाई, संजय कोळी, शेख वकील, मुक्ताईनगरचे नगरसेवक शेख आरिफ गणी, वैभव लोखंडे, राहुल वंजारी, सागर वंजारी, दीपक शेळके, संदीप वाणी, यश काळे, उमाकांत झांबरे यांच्यासह शिवसेना परिवारातील शिवसैनिक उपस्थित होते.