भुसावळ – सर्व प्रकारच्या वाढत्या प्रदूषणामुळे माणसाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे.अनेसर्गिक आहार विहारमुळे पंच ध्यानेंद्रियांच्या शक्तित घट होऊन रोग प्रतिकार शक्ती क्षीण झालेली आहे स्री पुरूष जीन्स रोग ग्रस्त होऊन जन्मतः होणारे आजार वाढतच आहेत.आजच्या ह्या सभ्य संस्कृतीच्या असयमी मानवाने नेसर्गिक आरोग्य रक्षणाच्या नियमांची पायमल्ली करून अनेसार्गिक आरोग्य रक्षणाच्या नियमांशी हातमिळवणी करून काय मिळवले?तर ते रुदय रोग, एड्स, कोरोना यासारख्या हादरवून टाकणाऱ्या रोगांची मालिका तयार करून प्रगत मेडिकल सायन्स काय आहे ? हे नवचित्र आपल्याला निर्माण करून दाखवले आहे
या सारख्या शेकडो प्रश्नांची उत्तरे देण्यास आधुनिक वैद्यकशास्त्र अपुरे पडत आहे,म्हणून तर योग ,निसर्गोपचार, एरोबिक योगा,ध्यान या सारख्या ड्रगलेस या पथ्याकडे जागतीक आरोग्य संघटनेचे लक्ष आता वेगाने जात आहे यासाठीच भुसावळच्या अँबेसेडेर सौ.माधुरी गुजर यांनी भुसावळ शहरातील विविध क्षेत्रातील महिलां साठी अगदी मोफत अश्या एरोबिक योगाची सुरुवात केली.
दि.८/५/२२ रोजी भुसावळ येथील स्टार लॉन रिसॉर्ट मध्ये सकाळी ६ ते ८ वाजता पिंकीथॉन चा ३ रा वर्धापन दिन जल्लोषात जवळपास ३०० सखींच्या उपस्थित साजरा झाला

भुसावळ शहरात दररोज सकाळी ६ ते ७ या वेळात ताप्ती पब्लिक स्कूल ग्राउंड आणि पवन नगर येथे नियमित एरोबिक वर्ग अगदी मोफत चालू आहेत, ताप्ती ग्राऊंड येथे प्रा.डॉ. सौ. भाग्यश्री भंगाळे आणि पवन नगर येथे प्रा.सौ. माधुरी गुजर मॅडम या नियमित एरोबिक वर्ग घेत आहेत
सदर वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पाहुणे सौ स्मिता मोहन फालक म्हणून उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी मान्यवर सौ.रजनी सावकारे , प्रा. डॉ. सौ.मीनाक्षी वायकोळे (प्राचार्य, नाहटा कॉलेज ),सौ.नूतन फालक या उपस्थित होत्या
या कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ ,भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले नंतर प्रा.सौ माधुरी गुजर यांनी प्रास्ताविक केले, त्यांनी योग ही भारतीय परंपरेची खुप मोठी भेट आहे .प्रत्येक व्यक्तीला योगाची आवशक्यता आहे,योगामुळे जीवन शांत,सुखद आणि परिपूर्ण होते,योगाचा नियमित सराव केला तर आपल्या जीवनशैलीत उल्लेखनीय परिवर्तन होते,जुने आजार नाहीसे होतात,रोग प्रतिकार शक्ती वाढते,ताणतणाव कमी होतात असे सांगितले,
त्या नंतर शारिरिक कसरत (warm up)केल्यावर प्रत्यक्ष एरोबिक योगाचा जोशात सर्व सखीनी आनंद लुटला.नंतर सर्वांनी एकच जल्लोष केला,सदरच्या कार्यक्रमात भरपूर लकी ड्रा, गरमागरम स्वादिष्ट नाश्ता,याचा आनंद सर्व सखिनी मनमुराद घेतला . कार्यक्रमाची सांगता राष्ट्गीत व गरबा नृत्य करून झाली, कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.डॉ सौ भाग्यश्री भंगाळे,सौ.अर्चना भगत, सौ.रेखा सोनवणे,सौ.संगीता टाक,प्रियंका चौधरी,सौ.शालिनी वाढेकर, सौ. भारती चव्हाण,सौ सारिका फालक यांनी परिश्रम घेतले .


