केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या घातक निर्णयांच्या विरोधासह अन्य विविध मागण्यांसाठी १७ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे भव्य मोर्चाचे आयोजन सुरु – भा प्र म राष्ट्रीय उपाध्यक्ष एम.पी. सिंग


भुसावळ – देशातील आयुध निर्माणींच्या निगमीकरण, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या घातक निर्णयांच्या विरोधासह अन्य विविध मागण्यांसह भारतीय मजदूर संघाच्या वतीने १७ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे भव्य देशव्यापी मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत कानपूर येथे २७ व २८ एप्रिल रोजी आयोजित अधिवेशनात याबाबत वाचा फोडण्यात येणार असल्याची माहिती भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एम.पी. सिंग यांनी दिली.
ते २१ रोजी येथील आयुध निर्माणीतील कर्मचारी संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी किशोर सूर्यवंशी, प्रकाश कदम, आर. आर. पाटील, संतोष चौधरी, अनिल भिरुड यांच्या सह युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सिंग यांनी, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे त्रैवाषिरक अधिवेशन आर्मापूर इस्टेट कानपूर येथे २७ व २८ एप्रिल रोजी होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने अधिवेशना सहभागी होणार आहे. या अधिवेशना केंद्र सरकारच्या कर्मचारीविरोधी निधीच्या विरोधात तसेच कमरचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत या अधिवेशनात चर्चा होणार आहे. तसेच नवू
नविन पेन्शन स्किम रद्द करुन जूनी पेन्शन स्किम लागू करण्यात यावी. रक्षा कारखान्यां निगमीकरण व गोको मॉडेल समाप्त करण्यात यावे. डीआरडीओमध्ये ट्रेड युनियनची गतिविधी सुरु ठेवण्यात यावी. रक्षा उद्योगात ठेकेदारी प्रथा समाप्त करण्यात यावी. वर्तमान रक्षा उद्योगातील स्थिती सुधारण्यात यावी. अनुकंपा आधारावर मेडिकल बोर्ड आऊट तसेच मृत कर्मचारी यांच्या वारसांना वन टाईमरिलेक्झेशन देवून सर्वाना नोकरी समाविष्ठ करण्यात यावे. कर्मचार्‍यांना ट्रान्सफर जाण्यासाठी सेट्रला ट्रान्सफर पॉलिसी ठरवण्यात यावी. यासह विविध मागण्यांवर चर्चा होणार असल्याचेही सिंग यांनी सांगीतले .
परिषदेस किशोर सूर्यवंशी , प्रकाश कदम, संतोष चव्हाण, अनिल भिरुड , आर आर पाटिल अभय विसपुते , तुषार बडगुजर , शेखर सूर्यवंशी, जयसिंग कदम , यांचेसह इतर युनियनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .