तरसोद येथून केला स्वराज्य पॅनलने प्रचाराचा शुभारंभ :

भुसावळ-तरसोद येथील गणपती मंदिरात गणरायाला नारळ फोडून व वंदन करून स्वराज्य पॅनलने प्रचाराचा शुभारंभ केला . यावेळी पॅनल मधील जेष्ठ उमेदवार नामदेव सुपडू नेमाडे यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले सोबत पॅनल प्रमुख रामकृष्ण कांशीराम पाटील ,गटनेते विनोद काशीनाथ पाटील, उज्वल पवार सरपंच सोनवद ता धरणगाव ,ग्रा.पं. सदस्य गुलाब पाटील. याप्रसंगी स्वराज्य पॅनलचे उमेदवार प्रवीण रमेश जाधव, दिलीप रघुनाथ पाटील, भिका सोमा सपकाळे, संजीव हिरामण पाटील,विलास सुरेश कोळी, रवींद्र भास्कर सोनवणे, किशोर बाळाराम पाटील, गणेश भगवंतराव देशमुख, विनोद गुलाबराव पाटील, संग्राम मीसे, संजय सोनार, कोमल जाधव, मोहसीनखान अजीजखान, नितीन सुभाष पवार, सीमा विठ्ठल पाटील, भारती संतोष वाडेकर लवकर या सुनील पाटील , प्रेमचंद अहिरराव, सुनील पाटील, स्वराज्य पॅनलचे हितचिंतक व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रत्येक उमेदवाराच्या डोक्यावर स्वराज्य पॅनल नावाची गांधी टोपी आणि ‘सभासदांच्या हितासाठी लढणारी माणसं म्हणजे स्वराज्य पॅनलची माणसं’ अशा आशयाचा घोषवाक्य असलेला बॅच सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ग.स. सोसायटी निवडणुकीच्या निमित्ताने आज मंदिर परिसरामध्ये संपूर्ण वातावरण स्वराज्यमय झाल्याचे दिसून येत होते. याप्रसंगी पॅनल प्रमुख यांनी आपल्या पॅनलची भूमिका विशद करताना सांगितले की, आपले स्वराज्य पॅनल हे सभासद हिताची धोरणे घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहे. सुज्ञ आणि जागृत सभासदांचा आम्हाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित असून स्वराज्य पॅनलची ध्येयधोरणे जास्तीतजास्त सभासदांपर्यंत पोहचविण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचेही नमूद केले.
तदनंतर स्वराज्य पॅनलचे पथक नियोजनाप्रमाणे तालुक्यातील वेगवेगळ्या दिशेने प्रचारासाठी रवाना झाले.