श्रीमती. प क. कोटेच्या महिला महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व पालक मेळाव्याचे आयोजन संपन्न : समाजामध्ये नावलौकिक मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो- श्री जयदीप पाटील यांचे प्रतिपादन :

भुसावळ- श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालय, भुसावळ येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व पालक मेळाव्याचे आयोजन यशस्वीरित्या संपन्न झाले.
महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सचे उदघाटन रांगोळी स्पर्धा व पोस्टर स्पर्धेचे फित काटून उदघाटन कबचौ उमवि जळगाव चे रजिस्टार डॉ. किशोर पवार, संस्थेचे अध्यक्षा श्रीमती पद्मा मोतीलाल कोटेचा, अध्यक्ष, श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळ, भुसावळ, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंगला साबद्रा, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. धनवीज , उपप्राचार्य प्रा. वाय. डी. देसले आदिंच्या उपस्थित होते .
पालक मेळाव्याचे प्रमुख वक्ते प्रमुख वक्ते नोबेल फाउंडेशन जळगावचे, संस्थापक श्री जयदीप पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मंगला साबद्रा, समिती प्रमुख प्रा. एस. बी. नेतनराव आदि मंचावर उपस्थित होते.
श्री जयदीप पाटील यांनी स्वातंत्र्योत्तर भारताचे अमृत महोत्सव वर्ष, पालक, पाल्य व शिक्षक यांचे योगदान : एक चिंतन या विषयावर पालक व विदयार्थींनीशी संवाद साधला. त्यामध्ये म्हणाले की समाजामध्ये नाव लौकिक करण्यासाठी संघर्ष करावा लागतोच पण पुरूषांच्या तुलनेमध्ये महिलांना अधिक संघर्ष करावा लागतो. स्त्री ही पुरूषापेक्षा अधिक शिस्तप्रिय असते. तीच्यामध्ये निर्णय क्षमता अधिक असते. ज्ञान व कौशल्याच्या आधारावर इतिहासांमध्ये स्त्रियांनी आपले कतव्य सिदध् केल्याचे दिसून येते. महिलांची काम करण्याची क्षमता पुरषांपेक्षा जास्त आहे. यश हे केवळ संघर्षातूनच निर्माण होते. त्यासाठी आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण स्वत: आपल्यावर निबंर्ध लावणे गरजे आहे. अवांत्तर वाचनाने ज्ञान वाढून चरित्र संपन्न बनण्यास मदत होते. शिक्षणामुळे अशक्य गोष्टी शक्य करता येतात त्यामुळे आपले करिअर बनविता येते. मुलींनी लग्नांनतर सुध्दा शिक्षण घेतले पाहिजे. स्वत:च्या पायावर उभे राहून आपल्या गावाचे, जिल्हाचे, राष्ट्राचे नाव लौकिक करता येते.
कार्यक्रमाचे अध्यक्षा प्राचार्य डॉ. मंगला साबद्रा यांनी सांगितले की; आमच्या महाविदयालयामध्ये वाचन संस्कार वृध्दिंगत करू. पालकमेळाव्याचे सूत्रसंचालन डॉ. व्ही.एस. पाटील यांनी तर आभार समिती सदस्य डॉ. एस. के. अग्रवाल यांनी केले.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्स निमित्त विविध कार्यक्रमामध्ये एकुण 125 विदयार्थींनीचा सहभाग होता. यामध्ये रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. स्नेहा गजभिये (11 वी विज्ञान) द्वितीय क्रमांक कु कल्पना चौधरी (प्रथम वर्ष संगणक) तृतीय क्रमांक कु. रेणुका थोरात (प्रथम वर्ष वाणिज्य)

पोस्टर्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. आयुषी मराठे (11 वी विज्ञान) व्दितीय क्रमांक कु. विदया भोई (तृतीय वर्ष कला हिंदी) तृतीय क्रमांक कु. जान्हवी दाभाळे (तृतीय वर्ष कला हिंदी)
नृत्य स्पर्धेमध्ये
प्रथम क्रमांक – तेजस्वी तायडे ( तृतीय वर्ष वाणिज्य )
व्दितीय क्रमांक – कु.प्रतिज्ञा मनोरे, कु.रक्षंदा बाविस्कर,कु. अनिता तायडे व मैत्रिनी प्रथम वर्ष वाणिज्य)
तृतीय क्रमांक – कु. चिन्मयी घन आणि संयुक्ता लाड(तृतीय वर्ष वाणिज्य)
गीतगायन स्पर्धेमध्ये
प्रथम क्रमांक – कु. गायत्री नाटेकर( एम.ए.हिंदी)
व्दितीय क्रमांक – अपर्णा चौधरी(एम काँम २)
तृतीय क्रमांक – कु. लावण्या चत्रत( प्रथम वर्ष कला ) आणि विपर्णा महाले (१२वी विज्ञान)
विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदविला.

समारोप प्रंसगी संस्थेचे अध्यक्षा श्रीमती पद्मा मोतीलाल कोटेचा, आदरणीय सौ. शशि महोनत (जोधपूर) व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंगला साबद्रा यांच्या शुभहस्ते सर्व स्पर्धकांना बक्षिस वितरण करून कौतुक करण्यात आले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. धनवीज , उपप्राचार्य प्रा. वाय. डी. देसले आदि उपस्थित होते. पारितोषिक वितरणाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. विनोद भालेराव यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रिएटीव थींक समिती प्रमुख डॉ. व्ही. एस. पाटील,
प्रा. अर्चना झिंगरन, पालक मेळावा समिती प्रमुख प्रा. एस.बी. नेतराव , डॉ. एस. के. अग्रवाल, प्रा. निलेश गुरूचल, डॉ. गिरीष एस. कोळी, प्रा. विनोद भालेराव, प्रा. गिरीष सरोदे, प्रा.मनिषा इंगळे, प्रा.सचिन पंडित, प्रा. शितल औतकर, प्रा.पूनम सोनवणे कु.निकिता सोनवणे
तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. सुरेश चित्ते, श्री. प्रदीप पाटील, श्री. नितिन चौधरी, श्री धर्मराज मराठे इत्यादीनी मोलाचे सहकार्य केले.