शास्त्रज्ञांनी स्पष्टच सांगितले ; कोरोना लवकरच संपणार –

नवी दिल्ली : कोरोनामुळे दोन वर्षांपासून अर्थव्यवस्थेवर मोठा परीणाम झाला असून कोरोनाचा नायनाट नेमका कधी होणार? हा प्रश्न सर्वांनाच सतावतो मात्र शास्त्रज्ञांनी याबाबत स्पष्टच सांगितले आहे. लवकरच कोरोनाचा नायनाट होणार असल्याचे शास्त्रज्ञ म्हणाले आहेत. देशात लसीकरण मोहिम सुरू केली असून आतापर्यंत लाखो लोकांनी लस घेतली आहे. कोरोनाविरोधात लसीकरण हे सर्वात मजबूत शस्त्र असल्याचे वॉशिंग्टनमधील शास्त्रज्ञ डॉ. कुतुब महमूद यांनी म्हटलं आहे. कोणताही साथीचा रोग कायमस्वरुपी नसतो आणि लवकरच कोरोना देखील संपेल, असेही त्यांनी सांगितलं.

लवकरच कोरोना महामारीतून बाहेर पडणार!
वॉशिंग्टनमधील शास्त्रज्ञ डॉ. कुतुब महमूद म्हणाले की, कोरोना कायमस्वरूपी राहू शकत नाही आणि तो संपेल. हा एक प्रकारचा खेळ आहे आणि या खेळात कोणीही विजेता नाही, हा ड्रॉ होणार आहे. एक वेळ येईल जेव्हा हा व्हायरस लपून जाईल आणि आपण खरोखरच जिंकू. आपल्याला आपल्या मास्कच्या मागे लपून राहावं लागणार नाही, त्यापासून आपली सुटका होईल. या क्षणाच्या आपण खूप जवळ आलोय, असं मला वाटतं. जसजसे आपण या वर्षात पुढे जाऊ, तस तसं आपण लवकरच महामारीतून बाहेर येऊ असं डॉ. कुतुब यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

देशात तीन कोटींवर पोहोचली रुग्णसंख्या
देशात गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. रविवार, 16 जानेवारी रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे दोन लाख 71 हजार 202 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा साडेचार लाखांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काही जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रीकव्हरी रेट 94.51 टक्क्यांवर आहे.