भुसावळात वाहतूक कोंडीची समस्या; पुढील आठवड्यापासून पालिकेची धडक मोहिम : वर्दळीच्या रस्त्यावरील अतिक्रमण निघणार :


भुसावळ : शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आल्याने वाहतूक कोंडीची समस्या शहरात निर्माण झाली आहे. या अनुषंगाने वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी पालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. पुढील आठवड्यापासून सुरूवातीला जामनेर रोडवरील अतिक्रमण हटवण्यात येणार असून त्यानंतर टप्प्या-टप्प्याने अन्य भागातील अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. नागरीकांनी आठवडाभरात स्वतःहून अतिक्रमण काढावे अन्यथा कारवाई अटळ असल्याचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार याांनी कळविले.

भुसावळातील अतिक्रमणही हटणार : मुख्याधिकारी
जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर शहरातील 227 अनधिकृत बॅनर्स जप्त करण्यात आले. यापुढे विनापरवाना बॅनर्स व होर्ग्डिंग्ज लावण्यात आल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल शिवाय पुढील आठवड्यापासून जामनेर रोडवरील अतिक्रमण व त्यानंतर टप्प्या-टप्प्याने शहरातील अन्य भागातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात येईल, असे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार म्हणाले.