जळगाव – भुसावळ तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायतीने राबवलेल्या स्वच्छ भारत मिशन योजनेची चौकशी पूर्ण झाली असून सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, या दोषींवर गुन्हे दाखल करावेत तसेच रोजगार हमी योजनेबाबत खोटा अहवाल सादर केल्याने या प्रकरणाची चौकशी करावी, तसेच जि.प.मधील वरीष्ठ व सक्षम अधिकार्यांच्या नियंत्रणात समिती गठीत करावी आदी मागण्यांसाठी राष्ट्रीय दलित पँथरचे जिल्हा सरचिटणीस तथा ग्रामपंचायत सदस्य प्रेमचंद सुरवाडे, जिल्हा सचिव सुभाष जोहरे, तालुका उपाध्यक्ष शरद सुरवाडे आदींनी आज सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण छेडल्याने खळबळ उडाली आहे.



