द्वारकाई व्याख्यानमाला यंदाही अाॅनलाइन – यंदा सातवे वर्ष


भुसावळ –
शहरातील जय गणेश फाउंडेशनने द्वारकाबाई कालिदास यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय अाॅनलाइन द्वारकाई व्याख्यानमालेचे अायाेजन केले अाहेे. या सांस्कृतिक, वैचारीक उपक्रमाचे यंदा सातवे वर्ष अाहे.
पुण्याचे कवी देवा झिंजाड हे २५ जुलै राेजी सकाळी १०.३० वाजता ‘कविता अाई-बापाच्या’ या विषयावर प्रथम पुष्प तर सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळचे कवी नितीन चंदनशिवे हे २७ जुलै राेजी सकाळी १०.३० वाजता ‘वेदनेचा तळ शाेधणारी कविता’ या विषयावर द्वितीय पुष्प गुंफतील. यवतमाळ जिल्ह्यातील सवना येथील गझलकार अाबिद मन्सर शेख हे २९ जुलै राेजी ‘अशी बहरली माझी गझल’ या विषयावर तृतीय पुष्प गुंफतील. काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर यंदाही मर्यादा अाहेत.
ही बाब लक्षात घेऊन ही व्याख्यानमाला झूम मिटिंगद्वारे घेण्यात येत अाहे. मनाेरंजन वाहिन्यांच्या मायाजालात अडकलेल्या नव्या पिढीला वाचन, श्रवणाची गाेडी लागावी म्हणून फाउंडेशनने हा सांस्कृतिक वैचारीक उपक्रम सुरू केला अाहे. गेल्या सहा वर्षांपासून ताे निरंतर सुरू असून यंदा सातवे वर्ष अाहे. माय, माती, माणूस ही या व्याख्यानमालेची मध्यवर्ती संकल्पना असते, असे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, माजी नगरसेविका सुषमा नेमाडे, समन्वयक गणेश फेगडे व पदाधिकाऱ्यांनी सांगितले.