जळगावच्या तरुणास 96 हजारात ऑनलाईन गंडवले ;

जळगाव

जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून नागरीकांनी व्यवहार करताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अशाच पद्धत्तीने जळगावच्या मयूर देवेंद्र चौधरी (26, रा.टेलीफोन नगर, जळगाव) या तरुणाला गंडवण्यात आले.

क्यू आर कोड पाठवून लांबवले पैसे
या तरुणाचे अमरावती शहरात स्वत:चे घर असून मॅजिकब्रिक्स या वेबसाईटवर ऑनलाईन जाहिरात दिली होती. त्यावरुन 5 जून रोजी रणदीपसिंग नाव सांगून एका व्यक्तीने मोबाईलवर संपर्क साधला व आर्मीत जम्मू काश्मिरला नोकरीला असून अमरावती युनीटला बदली झाल्याचे सांगत मला तुमचे घर भाड्याने घ्यायचे आहे असे सांगितले. संबंधित व्यक्तीने चौधरीकडे पेटीएम क्रमांक मागितला असता त्यानेही तो दिला. मयुरला 11 जून रोजी रात्री 8 वाजता संबंधित व्यक्तीचा फोन आला व क्युआर कोड पाठवून तो स्कॅन केल्यानंतर तरुणाच्या खात्यातून तब्बल 95 हजार 996 रुपये काढण्यात आले. तरुणाने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रामानंद नगर पोलिसात धाव घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *