जळगाव –
चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी गावाजवळ भरधाव वेगाने धावणार्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या या भीषण अपघातात एका दुचाकीवरील एकाच कुटुंबातील चौघे जागीच ठार झाले असून तीन जखमी झाले आहेत.रोहिणी गावावर शोककळा पसरली आहे

अधिक माहिती अशी की, चाळीसगाव येथून नांदगावच्या दिशेने दुचाकीवरून दोन पुरुष, एक महिला आणि एक बालिका जात होते. दरम्यान, तालुक्यातील रोहिणी गावाजवळ हॉटेल नक्षत्रच्या पुढे एका भरधाव वेगाने धावणार्या स्वीफ्ट कारने या दुचाकीला उडविले. यात दुचाकीवरील चारही जण जागीच ठार झाले, तर कारमधील तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन जण जागीच ठार झाले असून एक रूग्णालयात नेतांना तर एक उपचार सुरू झाल्यानंतर मृत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच परीसरातून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतांची ओळख पटली नसून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पोलिस सुत्रानीं दिली आहे.


