भुसावळात गोसेवासमिती व सखी श्रावणी महिला संस्थेतर्फे वटसावित्री पोर्णिमे निमित्त वृक्षारोपण ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील गो सेवा समितीच्यावतीने यंदा आगळ्या वेगळ्या पद्धतीने वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्यात आली . कोरोना काळातील सुरु असलेल्या सदय परिस्थिती मोठ्या प्रमाणात
ऑक्सीजनचा सर्वत्र तुटवडा झाल्याचे दिसून आले ,यामुळे झाडांचे महत्व सर्वांचे लक्षात घेवून झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना रुजवण्याकरीता पर्यावरणाच्या संवर्धनासाठी व हवेतील ऑक्सीजन वाढण्यासाठी , तसेच येणाऱ्या युवा पिढीला सुद्धा झाडांचे महत्व क़ळावे याकरीता खारीचा वाटा व आद्य कर्तव्य समजून येथील गोसेवक समिती व सखी श्रावणी महिला संस्थाच्या वतीने शहरातील टिव्ही टॉवर मैदानावर वृक्षरोपण करण्यात आले .
वट सावित्री पौर्णिमा व संस्थेच्या संकल्पा नुसार प्रत्येक सदस्याचे वाढदिवसानिमित्त एक रोप रुजवावे या अनुषंघाने गोसेवा परिवारातील सदस्या सौ स्मिता महाले यांच्या वाढदिवसानिमित्तही वृक्षारोपण करण्यात आले.
प्रसंगी सौ राजेश्री नेवे , उज्वला बागुल , यदिती झोपे, यांनी मनोगत व्यक्त केले .
यावेळी यदिती झोपे,
तेजल राणे,यदिती झोपे, गायत्री महाले, गायत्री साळी,रसिका माहुरकर, सौ निर्मला रावडे,सौ तुलसी टेकवानी, स्मिता महाले, सौ माया चौधरी,सौ स्मिता माहुरकर, सौ वंदना झांबरे, संस्थापक अध्यक्षा सौ राजश्री नेवे सो.वैशाली सावकारे ,पत्रकार उज्वला बागुल, सौ स्मिता महाले, सौ विमल ठाकुर , कोशल्या बाई ठाकुर, वैशाली सावकारे यांचेसह लक्ष, रोहित महाले, सुरज ठाकुर ,अनिकेत साळी, दुर्गेश झोपे, मोहित देसाई, गौरव साळी, यश बानाईत , यांच्यासह महिला भगिनी व गोसेवक परिवारातील सदस्य उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *