वरणगाव –

सहा वर्षापुर्वी वरणगाव शहरासाठी साडेतेरा कोटीची पाणी पुरवठा योजना मंजुर होऊन कार्यान्वीत झाली असुन त्या योजनेची सखोल चौकशीची मागणी शहर कॉग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली
नगर परिषदेच्या भाजपा कार्या काळात शहरासाठी साडे तेरा कोटीची योजना मंजुर करण्यात येऊन ते काम पुर्ण करण्यात आले सहाच वर्षात हि पाणी पुरवठा योजना नादुरुस्त कशी पाणी पुरवठा योजनेच्या नावावर भाजपा वांरवार आदोलन करून जनतेची दिशाभुल करीत असुन निवळ या योजने वरील झालेल्या चुका झाकण्याचे काम करीत असल्याचा आरोपा करीत या योजनेवरील पाईप लाईनचा व्हॉल पुर्ण खोलताच पाईप फाटून उघडा पडतो तसा यांचा भ्रष्टाचार उघड होण्याच्या भितीने पाण्याच्या नावाखाली खोटी आदोलन व राजकारण भाजपा करीत असल्याचा आरोप निवेदनात केला आसुन नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे या साठी कॉग्रेस सहमत आहे मात्र जुन्या साडे तेरा कोटी पाणी पुरवठा योजनेच्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी कॉग्रेस पंकज पाटील , अशफाक काझी , शौलेश बोदडे , मनोज देशमुख , कल्पना तायडे ., मुस्लीम अन्सारी यादी नी मुख्याधिकारी शे . समीर यांना निवेदन देते वेळी केली आहे


