जळगाव –
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पुन्हा जिल्ह्यातील पाच निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. भुसावळ बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत यांना आयपीएस अधिकार्यांपुढे नियंत्रण कक्षात यावे लागले असले तरी त्यांच्या कामाचा व गुन्ह्यांचा उकल करण्याचा धडाका पाहता त्यांना पुन्हा बाजारपेठ पोलिस ठाणे मिळाले आहे.
जिल्हा पोलिस दलातील चार निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंंढे यांनी याबाबतचे मंगळवारी आदेश काढले. त्यात मुक्ताईनगरचे पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांची प्रशासकीय कारणास्तव जळगाव नियंत्रण कक्षात तर मुक्ताईनगरसाठी नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक रामकृष्ण नारायण पवार यांची नियुक्ती करण्यात आली. धरणगाव पोलिस ठाणे प्रभारी जयपाल माणिकराव हिरे यांची अमळनेरला तर नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक अंबादास शांताराम मोरे यांची धरणगाव पोलिस ठाण्यात रीक्त पदावर बदली करण्यात आली. मंगळवारी दुपारी डॉ.प्रवीण मुंढे यांनी याबाबतचे आदेश काढले.



