जळगाव –
शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात अतिशय कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज शुक्रवार रोजी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले . यावेळी दिवसा देखील १४४ कलम लागू करण्यात आला आहे त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणीही घराबाहेर पडू नये , नाक्या नाक्यावर पोलिसांचे चेकपोस्ट उभारण्यात येणार असून पोलिसांनी कडक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडाची कारवाई होणार आहे याशिवाय बाहेर पडलेल्या इसमाची करोना टेस्टही केली जाणार आहे तसेच जे वाहन वापरणार आहे त्याच्यावर आरटीओ मार्फत ही कारवाई केली जाणार आहे असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे व कोरोना रोखण्यासाठी विनाकारण घराबाहेर पडू नये असेही आवाहन त्यांनी केले.



