भुसावळ (प्रतिनिधी )-
,आपल्या महाराष्ट्र मध्ये सुद्धा बेरोजगारी चे प्रमाण प्रचंड वाढत आहे.अनेक सुशिक्षित बेरोजगारावर उपासमा रीची वेळ त्यांच्यावर आलेली आहे.आपल्या राज्यातील विविध शासकिय भरत्या मोठया प्रमाणात रखडल्याने बेरोजगार युवक प्रचंड नैराश्यात आहे. अशातच गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र सरकारच्या आडमुठी धोरणमुळे शासनाच्या खूप साऱ्या विविध विभागात शासकीय नोकर भरती प्रक्रिया राखडल्या आहेत .या विविध रखडलेल्या शासकीय नोकर भरत्या साठी उमेदवारांची आवश्यक असणारी वयोमर्यादा बाद होता असल्यामुळे ते शासकीय नोकर भरती पासून वंचित राहतील व शासकीय नोकरी साठी स्वप्न रंगवू पाहणारे हे सर्व बेरोजगार उमेदवारांचे हे स्वप्न दिवा स्वप्न म्हणून उरेल आणि परिणामी बेरोजगारी वाढेल. बऱ्याच वर्षांपासून शासनाकडून शासकीय अस्थापना मधील भरती प्रक्रिया कधी आरक्षण मुद्दा, कधी न्यायालयिन मुद्दा, कधी राजकीय आडकाठी असल्यामुळे, कधी नैसर्गिक व आरोग्याशी संबंधित आपत्ती आल्यामुळे, कधी महाराष्ट्र सरकार कडून होणाऱ्या शासकीय भरती प्रक्रिया राखडल्याने, कधी या नोकरभरतीत होणाऱ्या भ्रष्टाचारामुळे, कधीकधी परीक्षांमधील प्रश्नपत्रिका लिक होण्यामुळे, शासनाच्या भरती प्रक्रिया करण्याबाबतीत असणारी उदासीनता , या व अनेक कारणांमुळे सदर विविध भरती प्रक्रिया रखडल्याने, नैराश्यात असलेल्या बेरोजगारांची वय वाढत असल्याने , महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय भरतीसाठी आवश्यक असलेल्या वयोमर्यादेत ही बेरोजगार मंडळी पात्र होत नाहीत व त्यामुळे नैराश्यातून बेरोजगार आत्महत्या करतात. म्हणून महाराष्ट्र सरकार च्या आडमुठी धोरणामुळे, कोरोना मुळे विविध खात्यांमध्ये न झालेल्या भरतीमुळे तसेच या व विविध कारणांमुळे प्रलंबित शासकीय नोकर भरतीत शासनाकडून नोकरभरतीतील सक्तीच्या वयोमर्यादेच्या पात्रतेत
अनेक सुशिक्षित बेरोजगार शासकीय नोकऱ्या पासून वंचित राहत असल्यानेमहाराष्ट्र सरकारच्या विविध खात्यातील प्रत्येक आस्थापनातील शासकीय नोकर भरतीतील प्रत्येक संवर्गातील वयोमर्यादा,जेवढे वर्ष विलंब झाला असेल, काही आपत्ती व संकट आली असतील तेवढे वर्ष महाराष्ट्र शासनाने सदर प्रत्येक शासकीय नोकरभरतीत वजा करून, बेरोजगार उमेदवारांना प्रत्येकाला शासकीय नोकर भरतीतील वयोमर्यादेत सूटमिळून वयोमर्यादा अट शिथिल करावी. अशी मागणी साई निर्मल फाउंडेशन भुसावळचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शिशिर दिनकर जावळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली असल्याचे एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.



