कोरोना रुग्ण संख्येत विक्रमी वाढ, आज तब्बल ७७२ पॉझिटिव्ह ; भुसावळात कोरोना बाधीत ६४ ;


जळगाव –

जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव वाढू लागला असून आज ७७२ नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले आहेत. तर २४६ रुग बरे होऊन घरी परतले आहे. एकंदरीत बाधित रुग्णसंख्येत विक्रमी वाढ पाहायला मिळत असून धाकधूक वाढवणारी आहे.

आज जिल्ह्यात जळगाव शहर ३५९, जळगाव ग्रामीण २३ , भुसावळ ६४ ,अमळनेर १९, चोपडा १०८,पाचोरा 02, भडगाव 02 ,धरणगाव 24,यावल 17 ,एरंडोल 48,जामनेर 13, रावेर 03,पारोळा 15,चाळीसगाव 51,मुक्ताईनगर 18, बोदवड 06 आणि इतर जिल्ह्यातील 0 असे एकूण 772 रूग्ण आज कोरोनाबाधीत आढळून आलेले आहे.

आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 63422 झालेली असून एकूण 57895 रूग्ण बरे झालेले आहे.आज दिवसभरात 246 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात सध्या 4126 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून जिल्ह्यात आज 5 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण 1401 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *