भुसावळ साईलीला महिला बचत गटातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन


भुसावळ (प्रतिनिधी )-
साईलीला महिला बचत गटातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 7 मार्च 2021 रोजी केले आहे‌‌. महिला दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ॲड जास्वंदी भंडारी व बचत गटातील महिलांना द्वारे केले आहे.
या कार्यक्रमात ज्या रक्तदात्यांना रक्तदान करायचे असेल त्यांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन फॉर्म भरायचा आहे.

रक्त हे रेड क्रॉस सोसायटी द्वारे घेतली जाईल यादरम्यान शासनाने दिलेल्या सर्व कायद्यांचे पालन केले जाईल व सर्व सुरक्षिता ठेवून कार्यक्रम पार पाडण्यात येईल.

*यावेळी जे रक्तदाते रक्तदान करणार आहेत त्यांना रेड क्रॉस सोसायटी द्वारे पन्नास हजार रुपयाचा एक्सीडेंट क्लेम, कार्ड व प्रमाणपत्र दिले जाईल.

जे कुपन दिले जाईल त्या कार्डचा फायदा रक्तदात्यांना व त्यांच्या कुटुंबाला होईल. कुटुंबाला रक्ताची गरज भासल्यास तीनशे रुपये पर्यंत रक्त घेताना सूट दिली जाईल व स्वतःला हजार रुपया पर्यंत सूट असेल.तसेच रक्त दिल्याने नविन रक्त तयार होते व प्रतिकारशक्ती वाढते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *