भुसावळातील रस्त्यामुळे दोघे रेल्वे कर्मचारी अपघाताचे शिकार ; दोघांचे हात फॅक्चर, जळगांव रोड वरील घटना ; रस्त्यावरील कचमुळे मोटार सायकल घसरली, थोडक्यात वाचले प्राण ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
डि आर एम कार्यालयातील कार्मिक विभागमधील मेडीकल विभागाचे चीफ ओएस गुलाब सोनवणे व सिनियर क्लर्क अविनाश सोनवणे हे मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजता मोटार सायकलवरुन जळगांवहुन भुसावळला येत असतांना भुसावळातील भोई नगर जवळ रस्त्यावर कच पडलेला असल्याने अविनाश सोनवणे यांची मोटार सायकल कच वरुण घसरल्याने दोन्ही जण मोटार सायकल वरुन खाली पडले त्यात दोघांच्या हाताला व पायाला जबर मार लागल्याने त्यांना तेथिल नागरीकांनी त्वरीत रिक्षामधून रेल्वे दवाखाण्यात दाखल केले, दोन्ही जण रेल्वे रुग्णालयात उपचार घेत आहे. हात व पाय फॅक्चर झाल्याने त्यांना प्लास्टर लावण्यात आले आहे.
शहरात रस्त्याची अतिशय दुर्दैवी अवस्था झाली असून दररोज एक ना अनेक अपघात होत आहेत रस्ते खराब असल्याने नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहरात अनेक ठिकाणी पथदिवे सुद्धा नाहीत त्यामुळेही अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *