दादर ते साई नगर शिर्डी दरम्यान साप्ताहिक सुपर फास्ट विशेष गाडी;


भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वेने दादर ते साई नगर शिर्डी -साप्ताहिक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालील प्रमाणे –
*02147 डाऊन साप्ताहिक विशेष दादर येथून दिनांक 05.03.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर शुक्रवारी 21.45 वाजता सुटेल आणि साई नगर शिर्डी  येथे दुसर्‍या दिवशी 03.45 वाजता पोहोचेल.
*डाऊन दिशा स्टॉप-नासिक रोड -00.47/00.50, मनमाड-01.45/01.50,कोपरगांव-02.49/02.50
*02148 अप साप्ताहिक विशेष साई नगर शिर्डी येथून दिनांक 06.03.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर शनिवारी सकाळी 07.25 वाजता सुटेल आणि दादर  येथे त्याच दिवशी 13.25 वाजता पोहोचेल.
*अप दिशा स्टॉप – कोपरगांव-07.59/08.00,
मनमाड-08.45/08.50,नासिक रोड-09.42/09.45
 
*संरचनाः 1 वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, 2 वातानुकुलीत
तृतीय श्रेणी, 7 शयनयान, 5 द्वितीय श्रेणी आसन.
*आरक्षणः पूर्णपणे राखीव असलेल्या 02147/02148 विशेष गाड्यांचे बुकिंग सामान्य भाडे दराने दिनांक 03.03.2021 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल.
उपरोक्त विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या सविस्तर वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *