जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णाची 500 कडे वाटचाल ;


जळगाव –
कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून आज दिवसभरात ४९२ कोरोना बाधीत आढळून आले आहेत. तर १४४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज २ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अहवालात जिल्ह्यात आजपर्यंत एकुण ६१ हजार ७६६ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी ५७ हजार २५२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ३ हजार १२५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत १३८९ रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे.

आज जळगाव शहरात १२४ बाधीत रूग्ण आढळून आले आहे. जळगाव तालुक्यात हाच आकडा ५३ इतका आहे. चोपडा तालुक्यात ७३ रूग्ण बाधीत असल्याचे दिसून आले आहे. चाळीसगाव तालुक्यात ८० पेशंट असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. दरम्यान, उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता, जामनेर ३७, भुसावळ २७; मुक्ताईनगर-१८, बोदवड-७; एरंडोल-१७; धरणगाव-१३; रावेर-१८; पारोळा-८; यावल व अमळनेर-२ असे रूग्ण आढळून आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *