भुसावळ (प्रतिनिधी )-
गांधी नगर भागातील रहिवासी संभाजी भगा भामरे यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त येथील भामरे परिवाराने वडिलांचे वाढदिवसानिमित्त धम्मदान करीत बौद्ध विहारासाठी 25 हजाराचा धनादेश देवून समाजापुढे आदर्श ठेवला आहे .
आपण समाजाचे काही देणे लागतो आपली भावी पिढी महामानव डॉ बाबासाहेब यांचे आदर्श व विचार जोपासत घडावी यासाठी येथील राजेन्द्र भामरे व महिला मुक्ति मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ संगीता भामरे यांचेसह भामरे परिवाराने त्यांचे वडील संभाजी भगा भामरे यांच्या वाढदिवसानिमित्त विहारासाठी धम्मदान म्हणून 25000/ हजार रुपयेचा धनादेश बौद्ध विहाराचे आयु कांबळे , तायडे , शेजवळकर ,व दामोदर काका यांचे सुपुर्द केला
. या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले व संभाजी भामरे यांना शुभेच्छा दिल्या .
यावेळी मनोज संभाजी भामरे , लता भामरे , सतिश तायडे व सुरेखा सतिश तायडे , रश्मी, पवन राजेंद्र भामरे , रविंद्र सावखेडकर व सौ माया सावखेडकर , आशुतोष सौ सोनल यांचेसह भामरे परिवार व नातेवाईक तसेच बौद्धविहारातील मान्यवर उपस्थित होते .



