भुसावळात शिवसेनेतर्फे कोरोना लसीची मोफत ऑनलाईन नोंदणी : विठ्ठल मंदिर वार्डात जनजागृती :


भुसावळ (प्रतिनिधी )-
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या तत्वानुसार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळातील कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरळीत पार पाडण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाला हातभार लावण्याचा निर्णय भुसावळ शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतला असून नागरिकांना लसीकरणाची नोंदणी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. 60 वर्षांवरील व्यक्ती व 45 वर्षांहून अधिक गंभीर आजारानं पीडित व्यक्तींनाही लस 1 मार्च 2021 पासून दिली जाणार असून शिवसेनेचा मदत कक्ष नागरिकांना नोंदणी करून देणार आहे. त्याबाबत आज शिवसेनेतर्फे विठ्ठल मंदिर वार्डात जनजागृतीस सुरुवात झाली. रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष जेष्ठ शिवसैनिक ललित मुथा, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, किशोर ठाकूर, गणेश पाटील यांनी नागरिकांना माहिती दिली.
कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडे मोबाईल असेलच असे नाही म्हणून सोशल डिस्टन्सचे पालन करीत भुसावळात विठठल मंदिर वार्ड, जुना सातारा व शिवसेना मध्यवर्ती कार्यालया येथे कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी सोय उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती बबलू बऱ्हाटे यांनी दिली आहे.
45 ते 60 वयोगटातील ज्या व्यक्ती गंभीर आजारानं त्रस्त आहेत त्यांना नोंदणीसाठी मेडिकल सर्टिफिकेटची आवश्यकता राहील. सोबत आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, चालक परवाना, पॅन कार्ड,. आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, पेन्शन कागदपत्र, बँक / पोस्ट ऑफिस पासबुक यापैंकी कोणतंही एक ओळखपत्र व मोबाईल क्रमांक नोंदणी करतांना नागरिकांनी उपलब्ध ठेवावा असे माहिती पत्रकात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *