वरणगावला शहीद जवान स्मारकाचे जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते उद्‌घाटन ;

वरणगाव =

वरणगाव पोलीस स्टेशन मध्ये टाकाऊ वस्तू पासुन टिकाऊ व आर्कषक असे शहीद स्मारक व युध्दात वापरल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राची प्रतिकृती तयार केली असलेल्या व बागीच्याचे उद्घाटन जिल्हा पोलीस प्रमुख यांचे हस्ते करण्यात आले
पोलीस स्टेशन एखाद्या गुन्हयात किंवा अपघातातील वस्तु माती होई पर्यन्त पडलेल्या राहतात मात्र उप पोलीस निरिक्षक सदिंप कुमार बोरसे व सह उप पोलीस निरिक्षक सुनिल वाणी व त्यांच्या सहकाऱ्यानी पोलीस स्टेशनच्या आवारात पडलेल्या अनेक टाकाऊ वस्तु पासुन सैनिक युद्धासाठी वापरतात तशी क्षेपणास्त्र बनविले असुन शहिद स्मारक व बागीचा तयार करण्यात आला असून यांचे उद्घघाटन जिल्हा पोलीस प्रमुख प्रविण मुढे यांचे हस्ते करण्यात आले
यावेळी मुक्ताईनगर उप विभागीय पोलीस अधिक्षक विवेक लावड , उपनिरिक्षक संदिप बोरसे , सुनिल वाणी , पो हे कॉ गणेश शेळके, मजहर पठाण ,अतुल बोदडे योगेश पाटील मनोहर पाटील . इत्यादी सह पोलीस कर्मचारी उपस्थीत होते या प्रसंगी जिल्हा पोलीस प्रमुखाच्या हस्ते या स्मारकाची शोभा वाढविणारे व बगीच्याची देखभाल करणारे सुधाकर बावस्कर यांचा सत्कार करण्यात येऊन पोलीस प्रमुखानी टाकाऊ वस्तु पासुन तयार घेतलेल्या क्षेपणास्त्र व शहीद जवान स्मारका व विद्युत रोषनाईने अतिशय सुंदर असा पोलीस स्टेशनचा परिसर झालेल्या वास्तुचे व अधिकारी व कर्मचाऱ्याचे त्यांनी कौतूक केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *