भुसावळात मास्क न वापरणार्‍यांवर डीवायएसपी सोमनाथ वाघचौरेची धडक कारवाई – मास्क वितरणासह केले प्रबोधन ;



भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना रुग्णांची सातत्याने वाढणारी संख्या पाहता पालिका व पोलिस प्रशासनाकडून मास्क न वापरणार्‍यांविरुद्ध धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे .
आज सोमवार रोजी शहरातील गांधी पुतळ्याजवळ डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी स्वतः मास्कचे वितरण करून नियमांचे पालन न करणार्‍या तरुणांना दंडात्मक कारवाई सोबत प्रबोधनही केले.
नियमांचे पालन करून नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच आपली आपल्या परीवाराची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे.
शहरात पालिका व पोलिसांचे संयुक्त पाच पथक तयार करण्यात आले असून या पथकात पालिकेचे तीन तर दोन पोलिस कर्मचारी अशा पाच जणांचा समावेश आहे. पाच पथकांतील 25 कर्मचार्‍यांकडून शहरात मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टंन्सींगची अंमलबजावणी करणे आदींबाबत उपाययोजना व या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. पालिका व पोलिस विभागाकडून या कारवाईला पुन्हा गती दिली जाणार असल्याची माहिती पालिकेचे उपमुख्याधिकारी महेंद्र कतोरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *