भुसावळ (प्रतिनिधी )-
रात्री 10 वाजेनंतरही रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स व ढाबा सुरू ठेवणार्या दोघा चालकांविरुद्ध पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी शुक्रवारी कारवाई केल्याने हॉटेल व्यावसायकांमध्ये खळबळ उडाली. त्यात यावल नाक्याजवळ दरवाजा आतून बंद करून सुरू असलेल्या काकाचा ढाब्यावर रात्री 1.30 वाजता कारवाई करण्यात आली तसेच जामनेर रोडवर रात्री 12.30 वाजेपर्यंत सुरू असलेल्या हॉटेल चेतनमध्येही गोंधळ सुरू असल्याने कारवाई करण्यात आले. दोन्ही हॉटेलच्या व्यवस्थापकांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले.



