भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायतीला नुकताच दहा लक्ष रुपयांचा तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झालेला असून आता जिल्हास्तरीय पन्नास लक्ष रुपयांच्या पुरस्कारासाठी ग्रामपंचायत प्रशासनान सज्ज झाले आहे. नुकतीच जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार निवड समितीने स्मार्ट विलेज साकेगाव ग्रामपंचायतीला भेट देऊन गावाचे सर्वेक्षण केले.
समितीमध्ये अध्यक्ष म्हणून जामनेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कवड देवी, विस्तार अधिकारी बैरागी, राठोड आदींचा समावेश होता. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, आनंद ठाकरे, सुरेश पाटील, माणिक पाटील, विष्णू सोनवणे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य कुंदन कोळी, सचिन सपकाळे सागर सोनवाल, गजानन पवार, गजू कोळी, पप्पू राजपूत, सुभाष सोनवणे, ग्रामविकास अधिकारी खैरनार व ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाची व ग्रामस्थांची उपस्थिती होती. सर्वेक्षण समितीला माजी सरपंच अनिल पाटील, आनंद ठाकरे यांनी गाव विकासा संदर्भातील सविस्तर माहिती दिली



