मुंबई –
मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर विभागात तब्बल जवळपास 2500 जागांवर भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली असून यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
5 मार्च पर्यंत अर्ज करण्याची मुदत
मध्ये रेल्वेने अॅप्रेंटिस पदासाठी ही भरती आयोजित केली आहे. अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 5 मार्च 2021 असणार आहे. याशिवाय परळच्या वर्कशॉपमध्ये, कल्याण डिझेल शेड आणि मनमाडच्या वर्कशॉपमध्येही विविध जागांवर भरती करण्यात येत आहे. अशा आहेत भरती प्रक्रियेसाठी रीक्त जागा
मुंबई
कॅरेज अँड वॅगन (कोचिंग) वाडी बंदर – 288 पोस्ट
मुंबई कल्याण डिझेल शेड – 53 पोस्ट
कुर्ला डिझेल शेड – 60 पोस्ट
एसआर. डीईई (टीआरएस) कल्याण – 179 पोस्ट
एसआर. डीईई (टीआरएस) कुर्ला – 192 पोस्ट
परळ वर्कशॉप – 418 पोस्ट
माटुंगा वर्कशॉप – 547 पोस्ट
एस अँन्ड टी वर्कशॉप, भायखळा – 60 पोस्ट
भुसावळ
कॅरेज व वॅगन डेपो – 122 पोस्ट
इलेक्ट्रिक लोको शेड, भुसावळ – 80 पोस्ट
इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह कार्यशाळा – 118 पोस्ट
मनमाड कार्यशाळा – 51 पोस्ट
टीएमडब्ल्यू नाशिक रोड – 49 पोस्ट
पुणे
कॅरेज व वॅगन डेपो – 31 पोस्ट्स
डिझेल लोको शेड – 121 पोस्ट
नागपूर
इलेक्ट्रिक लोको शेड – 48 पोस्ट
अजनी कॅरेज व वॅगन डेपो – 66 पोस्ट
सोलापूर
कॅरेज व वॅगन डेपो – 58 पोस्ट
कुर्डुवाडी कार्यशाळा – 21 पदे
शिक्षणाची अट…
या पदांसाठी शिक्षणाची अट ही 10 वी पास किंवा 12 वी पास अशी ठेवण्यात आली आहे. यासाठी 50 टक्के कमीत-कमी गुण लागणार आहेत. व्होकेशनल, आयटीआय किंवा समकक्ष कोर्स केल्याचे प्रमाणपत्र देखील लागणार आहे.
वयाची अट…
वय 15 ते 24 वर्षे.
फी..
उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये ठेवण्यात आले आहे.
अशी होणार निवड प्रक्रिया
10 वी किंवा 12 वीचे मार्क आणि आयटीआयमधील मार्क पकडून मेरीट लिस्ट तयार केली जाणार आहे. यानंतर उमेदवाराची निवड केली जाणार आहे.



