भुसावळ (प्रतिनिधी )-
अभियांत्रिकी अर्थात इंजीनीरिंग म्हणजे प्रचंड मोठ्या शक्यतांचा महासागर आणि ह्या महासागरात उतरण्याची तयारी करण्यासाठी सज्ज व्हा, स्वतःमधले गुण ओळखून, त्यांचं संवर्धन करा तसेच स्वतःतील त्रुटि, अवगुण ओळखत त्यांना दूर करीत सतत आत्मपरीक्षण करा असे मार्गदर्शन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागाचे विभाग प्रमुख डॉ.गिरीश कुळकर्णी यांनी भुसावळ येथील हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित इंडक्शन प्रोग्राम मध्ये केले. प्राचार्य डॉ. आर. पी. सिंह यांनी केले.डीन डॉ. राहुल बारजिभे, विभाग प्रमुख डॉ. सुधीर ओझा, प्रा.अविनाश पाटील, डॉ.पंकज भंगाळे, डॉ. गिरीश कुलकर्णी, प्रा.अजित चौधरी, डॉ. दिनेश पाटील उपस्थित होते.
भारतीय अभियंत्यांनी तयार केलेलं तंत्रज्ञान जागतिक पातळीवरील भविष्याच्या तंत्रज्ञानाचा आरसा आहे. गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना असे शिक्षण देण्यात येत आहे ज्याद्वारे केवळ त्यांच्याच नव्हे तर इतरांच्या आयुष्यातही परिवर्तन घडविण्याची शक्यता आहे याची आठवण त्यांनी करून दिली. अपयशाला न घाबरता धैर्याने आपली आवड जोपासा, स्वप्नांचा पाठलाग करा आणि आपल्या कुटुंबाला आणि देशाला गर्व वाटेल अशी कामगिरी करा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रा.धिरज पाटील, प्रा.किशोर चौधरी, प्रा.अनिकेत पाठक, प्रा.युवराज परदेशी, प्रा.अभिजित इंगळे यांनी परिश्रम घेतले.



