भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील नॅशनल हायवे क्रमांक सहा नहाटा चौफुली पाण्याच्या टाकी समोर भरधाव वेगाने वाळूचा एक ट्रक परवाना नसतांना वाळूची चोरटी वाहतूक करणारा मिळून आल्याने पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी पोकॉ प्रशांत परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 1 रोजी रात्री 10.15 वाजेच्या सुमारास नॅशनल हायवे क्रमांक सहा नहाटा चौफुली पाण्याच्या टाकी समोर भुसावळ येथे मालट्रक क्रमांक एम.एच.27 एल.एक्स 3306 चा चालक नामे सुनील विश्वनाथ भोई वय 34 राहणार साकेगाव हा ट्रकमध्ये वाळू 15,000 रुपये किंमतीची तीन ब्रास रेती गौणखनिज बांधकामासाठी वापरली.2,00,000 रुपये किंमतीची एक टाटा कंपनीची मालट्रक एम.एच.27 एल.एक्स 3306 एकूण 215000 किंमतीची वाहतूकीचा परवाना नसतांना ट्रक मालक देविदास लटकन कोळी राहणार साकेगाव ता. भुसावळ यांचे संगनमताने शासनाची गौणखनिज संपत्ती वाळूची चोरटी वाहतूक करीत असतांना मिळून आला म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध कलम 48,379,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ सुनील बारकू जोशी करीत आहे.



