नाहाटा महाविद्यालयात “Multidisciplinary use of Artificial Intelligence” या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन….

भुसावळ (प्रतिनिधी)- येथील भुसावल कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा  वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ येथे  ‘Multidisciplinary Use of ArtificiaI Intelligence’ या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन मंगळवार दिनांक 22 सप्टेंबर 2026 रोजी करण्यात आले. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  डॉ. मोहनभाऊ फालक होते. यावेळी संस्थेचे चेअरमन  श्री महेश भाऊ फालक, संस्थेचे सचिव  श्री विष्णूभाऊ चौधरी आणि संस्थेचे कोषाध्यक्ष  श्री संजयकुमारजी नाहाटा यांनी कार्यक्रमाला फोन द्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. आर. वाणी, उपप्राचार्य प्रा. डॉ. डी. एन. पाटील, कानिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. वाय. एम. पाटील, फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत सरोदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ. दयाघन एस. राणे आणि हर्षाराणी बऱ्हाटे (ऑस्ट्रेलिया) यांनी ‘Multidisciplinary use of AI’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
   शिक्षण, विज्ञान, संशोधन, उद्योग, आरोग्य, व्यवसाय, शेती तसेच दैनंदिन जीवनातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापराबाबत त्यांनी माहिती दिली. AI चा जबाबदारीने, सर्जनशीलतेने आणि प्रभावीपणे वापर करून भविष्यातील संधींसाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला तयार करावे, असे त्यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचे विविध क्षेत्रांतील उपयोग, भविष्यातील संधी आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक कौशल्यांविषयी माहिती दिली.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. मोहनभाऊ फालक यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी पारंपरिक ज्ञानासोबत कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत सरोदे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विरल वंदन वाणी यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. स्वाती चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. कोमल सरोदे, प्रा वैभव पाटील, प्रा.ए. बी. पालवे , प्रा. एच. बी. राजपूत, प्रा. पी. बी. महाजन, प्रा. पी. व्ही. पाटील, प्रा. प्रणिता राणे, श्री. पी. एन. सपकाळे, श्री. ए. आर. महाजन, श्री. एस. डी. तायडे, श्री. एस. पी. बावस्कर, श्री. जी. आर. चौधरी, श्री. एन. आर. पाटील, श्री. एम. ऐ. चौधरी आणि महाविद्यालयातील सर्व प्राद्यापक बंधू भगिनी आणि शिक्षेकेतर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.
फोटो कॅप्शन- फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विभाग आयोजित "Mutidisciplinary Use of Artificial Intelligence" या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रप्रसंगी बोलतांना संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉ. मोहनभाऊ फालक,  सोबत व्यासपीठावर प्रमुख वक्ते प्रा. डॉ. डी. एस. राणे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. आर. वाणी, उपप्राचार्य प्रा. डॉ. डी. एन. पाटील, कानिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. वाय. एम. पाटील, फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत सरोदे