भुसावळ (प्रतिनिधी )-बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे २९ ऑगस्ट या 'राष्ट्रीय क्रीडा दिवस' निमित्त उत्साह पूर्ण वातावरणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे युथ व एज फ्रॉड कमिशनचे चेअरमन निलेश बाविस्कर तसेच जळगाव जिल्हा पोलीस बलाचे प्रमुख संतोष सुरवाडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी बियाणी मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थी खेळाडू द्वारा विविध क्रीडा प्रकारांचे प्रदर्शन व प्रात्यक्षिक सादरीकरण हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. विविध क्रीडा प्रकारांच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी आपल्या क्रीडा नैपुण्य,शिस्त,आत्मविश्वास व संघ भावना यांचे उत्कृष्ट सादरीकरण करीत सर्व मान्यवर व उपस्थितांची मने जिंकली.
याप्रसंगी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी,उपाध्यक्ष विनोद बियाणी, सचिव डॉ.संगीता बियाणी,राजीव पारिख, प्रवीण भराडिया,प्राचार्य डी एम पाटील,बियाणी ग्रुपच्या विविध संस्थांचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख हिम्मत पाटील,प्रशिक्षक चंद्रशेखर बरगले व सर्व क्रीडा शिक्षक यांनी प्रयत्न केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक आर के तायडे व शिक्षिका हिना पटेल यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य डी एम पाटील यांनी केले.
फोटो कॅप्शन : क्रिडा दिनानिमीत्त मशाल ज्योत पेटवून उद्धाटन करतांना निलेश बावीस्कर व संतोष सुरवाडे सोबत मनोज बियाणी,डॉ.संगीता बियाणी,विनोद बियाणी,डी एम पाटील,राजीव पारीख व इतर