जळगाव (प्रतिनिधी ) - दिनांक ११/०६/२६ रोजी वंचित बहुजन कंत्राटदार संघटना च्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रकाश सरदार यांच्या नेतृत्वाखाली निवेदन जिल्हा अधिकारी कार्यालय,जळगाव येथील मुख्यमंत्री कक्ष च्या अधिकारी ज्योती वसावे यांना देण्यात आले. या निवेदनात महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कंपनी मर्यादित अंतर्गत येणाऱ्या महाजनको, महावितरण,महापारेषण व इतर सेवा कंपन्या मध्ये सेवा देणाऱ्या कंत्राटदारांना एम.एस ई.बी व एच.सी.एल. मेडिकलेम समुह विमा देण्यात यावा. जेणे करून कंत्राटदार व कुटुंबियांना त्याचा लाभ मिळेल. सदर संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचारी, अधिकारी,कंत्राटदाराचा मजूर यांना विमा संरक्षण आहे. मात्र महाराष्ट्रातील कंत्राटदाराला अशा प्रकारचे कोणतेही विमा संरक्षण मिळत नाही. त्यामुळे कंत्राटदार व त्यांच्या कुटुंबियांना अचानक आलेल्या आजारावर वेळेवर उपचार न झाल्याने जीव गमवावा लागतआहे. या योजनेचा करोना काळात कंत्राटदाराच्या मजुराला लाभ मिळाला मात्र कंत्राटदार असा लाभ मिळाला नाही. त्यामुळे आजही बरेच कंत्राटदार व त्यांचे कुटुंब यांना आपला जीव गमवावा लागत आहे .त्यासाठी निवेदनाद्वारे संघटनेच्या माध्यमातून एम एस ई बी एच सी एल समूह विमा संरक्षण महाराष्ट्रातील कंत्राटदारांना देण्यात यावे. याकरीता महाराष्ट्रातील सर्व कंत्राटदार संघटना एकत्रित येऊन यासाठी लढणार आहे. असे वंचित बहुजन कंत्राटदार संघटना चे प्रदेश अध्यक्ष प्रकाश सरदार यांनी कळविले आहे. याबाबत लवकरच सर्व कंत्राटदार संघटनेची राज्य स्तरीय बैठक मुंबई येथे घेण्यात येणार आहे. सदर निवेदनावर प्रदेश अध्यक्ष प्रकाश सरदार, प्रदेश सचिव उस्मान पठाण, उपाध्यक्ष प्रकाश तायडे, संघटक नारायण झटके, कोषाध्यक्ष मनसाराम कोळी, सहसचिव संतोष तेलंग, दिनेश इखारे, रामचंद्र तायडे, प्रेमसिंग ठाकूर, यांच्या सह्या आहेत.


