भुसावळ (प्रतिनिधी) – प्रेमविवाहानंतर तरुणावर झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच संशयित आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले असून. प्रकरणातील मुख्य आरोपी यांची पोलिस कोठडी २७ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे

बुधवार दि. २५ मार्च रोजी या प्रकरणातील कोमल प्रकाश पाटील (२४), विजय नरोत्तम पाटील (५२), हेरंब महेश चौधरी (१९), ज्ञानेश्वर भास्कर भोई (१९) आणि संजय सोनू बढे (६१) या पाच आरोपींची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला असून या प्रकरणातील मुख्य आरोपी मनोज पाटील आणि रूपाली उर्फ पूनम पाटील यांची पोलिस कोठडी २७ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. या घटनेत आतापर्यंत एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


