मुक्या समाजाचा बुलंद आवाज : ‘मूकनायक’-लेखक : जयसिंग वाघ

जळगाव – हजारो वर्षांपासून इथला शूद्र-अतिशूद्र म्हणून ओळखला जाणारा समाज मुक्या जनावरासारखा जगत होता. त्याचे हंबरडे जणू त्याच्या गोठ्यापुरतेच मर्यादित होते. भारतात इंग्रज आले. त्यांनी इंग्रजी शाळा सुरू केल्या. महात्मा फुले यांनी या शाळा मुक्या समाजापर्यंत पोहोचवल्या आणि या समाजाची दुःखे, हालअपेष्टा तसेच त्यांच्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला.

महात्मा फुले यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन त्या काळातील महार समाजातील लढाऊ व्यक्तिमत्त्व असलेले गोपाळ बाबा वलंगकर यांनी दीनमित्र, दीनबंधू, सुधारक अशा वृत्तपत्रांतून मुक्या समाजाच्या व्यथा, अन्याय व अत्याचार मांडले. त्यांनी १८९८ मध्ये ‘विटाळ विध्वंसक’ हे पुस्तक लिहून धर्माच्या ठेकेदारांना एकूण २६ प्रश्न विचारले आणि नवे वादळ निर्माण केले.

गोपाळ बाबा वलंगकर यांच्या प्रयत्नांनी प्रेरित होऊन किसन फागोजी बनसोड यांनी ‘निराश्रित हिंद नागरिक’ हे साप्ताहिक सुरू केले. शिवराम जानबा कांबळे यांनी १९०८ मध्ये ‘सोमवंशीय मित्र’ हे साप्ताहिक सुरू केले. किसन फागोजी बनसोड यांनी १९१८ मध्ये ‘मजूर पत्रिका’ नावाचे दुसरे साप्ताहिक सुरू केले. या महार समाजातील नेत्यांनी स्वतंत्र वृत्तपत्रे सुरू करून या देशातील गुलामगिरीची लक्तरे वेशीवर टांगली.

धर्माला प्रश्न विचारणे, समाजाचे प्रश्न मांडणे, माणूस म्हणून जगण्याचे हक्क मागणे, स्त्रियांच्या शोषणावर भाष्य करणे—असे लिखाण या नियतकालिकांतून उमटत होते. त्याचबरोबर जागृत, डेक्कन रयत, विजयी मराठा, ज्ञानप्रकाश, सुबोध पत्रिका व इतर काही नियतकालिकांतूनही हे प्रश्न मांडले जाऊ लागले. मात्र अस्पृश्य समाजाने सुरू केलेली बहुतांश नियतकालिके अल्पायुषी ठरली. वलंगकर, कांबळे आणि बनसोड हे त्या काळातील अस्पृश्य समाजाचे नामांकित पुढारी म्हणून ओळखले जात होते.

पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण सुरू असतानाच अस्पृश्य समाजासाठी स्वतंत्र मुखपत्र असावे, यासाठी प्रयत्न सुरू केले. त्या वेळी ते सिडनेहॅम येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. स्वतःचे मुखपत्र चालविताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन त्यांनी संपादकपदाची जबाबदारी अन्य व्यक्तीकडे सोपवली. अखेर ३१ जानेवारी १९२० रोजी ‘मूकनायक’ या पाक्षिकाची सुरुवात झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपादकीय लेखन स्वतः लिहीत असत. संपादक म्हणून त्यांनी पदवीधर, सामाजिक व पुरोगामी चळवळीत प्रभावी काम करणारे पांडुरंग नंदराम भटकर यांची निवड केली. भटकर हे त्या काळात विशेष प्रसिद्ध होते. ब्राह्मण मुलीशी विवाह केल्यामुळेही ते चर्चेत होते. लिखाणाची आवड असल्याने त्यांनी ही जबाबदारी आनंदाने स्वीकारली. ज्ञानेश्वर घोलप हे व्यवस्थापक होते. भटकरांनंतर घोलप हेच संपादक झाले.

मूकनायक सुरू करताना बाबासाहेब म्हणाले होते—

“कोणतीही चळवळ यशस्वी करावयाची असेल, तर त्या चळवळीचे स्वतंत्र वर्तमानपत्र असणे आवश्यक आहे. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, ती चळवळ पंख तुटलेल्या पक्ष्यासारखी असते.”

३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायकचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. त्या काळातही आजप्रमाणेच फसवा व खोटा राष्ट्रवाद फोफावला होता. आम्हीच खरे देशभक्त आहोत, आम्हालाच राष्ट्रवाद कळतो—अशा तोऱ्यात काही मंडळी वावरत होती. आपल्या देशातीलच दुसऱ्या समाजाचा जास्तीत जास्त द्वेष करणे म्हणजेच देशभक्ती, अशी संकल्पना मांडली जात होती. अशा बाजारबुणग्यांना मोठी प्रसिद्धीही मिळत होती.

मात्र खरा राष्ट्रवाद काय असतो, याचे स्पष्ट प्रतिबिंब मूकनायकमध्ये दिसते. एका अंकात लिहिले आहे—
“जसे एक माणूस म्हणजे कुटुंब नव्हे, तसेच एकच जात, समाज किंवा गाव म्हणजे राष्ट्र नव्हे. अनेक माणसे मिळून कुटुंब, अनेक कुटुंबे मिळून समाज, अनेक समाज मिळून प्रांत आणि अनेक प्रांत मिळून राष्ट्र घडते. प्रत्येक घटकात आपलेपणाची भावना नसेल, तर राष्ट्र जिवंत राहू शकत नाही.”

‘एक राष्ट्र म्हणजे एक कुटुंब’ ही शिकवण सर्वप्रथम मूकनायकने या देशाला दिली. मूकनायक निव्वळ एका जातीचा, व्यक्तीचा किंवा चळवळीचा वृत्तपत्र राहिला नाही. इतर वृत्तपत्रांत अस्पृश्य समाजाच्या प्रश्नांना जागा नसेल, तरी मूकनायकने संपूर्ण देशाचे प्रश्न ऐरणीवर आणले. माणसाचे माणूसपण काय असते, त्याचे हक्क काय असतात—याची शिकवण मूकनायकने दिली. मुक्या समाजाचे मुखपत्र न राहता, वाचाळवीरांचे मुख बंद करणारे मुखपत्र म्हणून मूकनायक ओळखला गेला.

या अंकासाठी राजर्षी शाहू महाराजांनी ₹२५०० इतकी मदत दिली. निधीअभावी मूकनायकचे केवळ १४ अंक प्रसिद्ध झाले. तरीसुद्धा निष्पक्ष आणि निस्पृह पत्रकारिता कशी असावी, याचा आदर्श तो देऊन गेला आणि भारतीय वृत्तपत्रांच्या इतिहासात आपला ठसा उमटवून गेला.

मुक्या समाजाचा बुलंद आवाज : ‘मूकनायक’

मुक्या समाजाचा बुलंद आवाज : ‘मूकनायक’

लेखक : जयसिंग वाघ

हजारो वर्षांपासून इथला शूद्र-अतिशूद्र म्हणून ओळखला जाणारा समाज मुक्या जनावरासारखा जगत होता. त्याचे हंबरडे जणू त्याच्या गोठ्यापुरतेच मर्यादित होते. भारतात इंग्रज आले. त्यांनी इंग्रजी शाळा सुरू केल्या. महात्मा फुले यांनी या शाळा मुक्या समाजापर्यंत पोहोचवल्या आणि या समाजाची दुःखे, हालअपेष्टा तसेच त्यांच्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला.