वंदे मातरम्” राष्ट्रगीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम रंगला …! परिसरात देशभक्तिमय वातावरण…

जळगाव/प्रतिनिधी :- ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताला १५० वर्ष पूर्ण झाली, या अनुषंगाने दि. 7 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्षातर्फे “वंदे मातरम ” ही गीत गायले गेले. जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर चौकात सायंकाळी देशभक्ती गीतांचा स्फूर्तिदायी कार्यक्रम चांगलाच रंगला..सुबोनियो परिवाराच्या सहकार्याने या देखण्या व जोशपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते..खान्देशातील कलावंत व निवेदक तुषार वाघुळदे प्रेझेंट्स खान्देशातील सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा 7 स्ट्रिंग्सच्या कलाकार यांनी देश भक्ती गीतांची मैफिल गाजवली आणि रसिक-प्रेक्षक व नागरिकांची वाहवा मिळवली..उपस्थितांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन कलावंतांचे कौतुक केले. या मैफिलीत सुपरिचित गायक नारायणभाई ओझा ,नवगायिका दीक्षा , तुषार वाघुळदे,निलेश पाटील यांनी प्रेक्षकांची मने जिंकून टाळ्यांची चांगलीच दाद मिळवली…! प्रारंभी भारतमातेचे पूजन जळगावचे आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे , उद्योगपती व पर्यावरण प्रेमी सुबोध कुमार चौधरी यांनी केले. कालिंका परिसरात रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या.
‘वंदे मातरम्’ हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी ‘आनंदमठ’ या कादंबरीत लिहिलेले एक देशभक्तीपर गीत आहे. हे गीत १९५० मध्ये भारताचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले आहे आणि याचा अर्थ ‘मातृभूमीस वंदन’ असा होतो.भारतीय स्वातंत्र्य चळवळीत हे गाणे एक महत्त्वाचे घोषवाक्य बनले. वंदे मातरम या गीताला तब्बल दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जनजागृती म्हणून हा उपक्रम सर्वत्र राबविला जात आहे.
या संगीत कार्यक्रमात वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत सामूहिक स्वरूपात सगळ्यांनी गायले..’सारे जहाँ से अच्छा’, ‘जहाँ डाल-डाल पर सोने की चिड़िया’, ‘मेरे देश की धरती’, ‘देश रंगीला, दिल दिया है, जान भी देंगे, ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियो’, ऐ मेरे वतन के लोगों.. ये देश है वीर जवानों का,मेरे देश की धरती..,’कर चले हम फिदा’..,मां तुझं सलाम ,सारे जहाँ से अच्छा..,यासह अनेक देशभक्तीपर गाणी गायली गेली.. याप्रसंगी बंटी भारंबे ,दिनेश अत्तरदे ,चिराग काळे ,प्रदीप रोटे,विरेन खडके ,महेश चौधरी ,मिलींद चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी भारतमातेचे पूजन आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. वंदे मातरम याबद्दल जनजागृती व माहिती विशद केली.या शानदार संगीत कार्यक्रमाचे आपल्या विशेष व दमदार आवाजात सूत्रसंचालन कलावंत तुषार वाघुळदे यांनी केले..