भुसावळ (प्रतिनिधी ) – कधी कधी नात्यांमध्ये गैरसमजांचे ढग दाटून येतात,
आणि क्षणात आपण एकमेकांपासून दूर जातो…
पण जेव्हा संवाद, समजूत आणि योग्य सामुपदेशनाची दिशा मिळते,
तेव्हा तुटलेली मने पुन्हा जुळतात!

अश्याच काहीश्या गैरसमज व मतभेदांमुळे वेगळे झालेले, एक दाम्पत्य .. लहान बाळासकट दूर झाले होते खरं तर ते जन्माचे साथीदार होते मात्र गैरसमजातून विभक्त होण्याच्या मार्गावर होते .सौ आरती चौधरी यांच्या जादूई समुपदेशनाने तुटलेली मने पुन्हा जुळली व संसाराला लागली .
दिवाळीच्या सुट्टीत गावाकडे आल्यावर त्यांनी आनंदाने सौ आरती चौधरी यांना भेट दिली त्यांना मिळालेल्या
योग्य मार्गदर्शनानंतर आणि समुपदेशनामुळे ते व पुन्हा एकत्र आले
त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि डोळ्यांतील तेज पाहून
मन भावनांनी ओथंबून आलं…! “सक्षम” च्या ऑफिसमधील वातावरण त्या क्षणी एकदम भावुक झालं.
खरंच, योग्य मार्गदर्शन आणि सामुपदेशन
हेच नात्यांना पुन्हा जिवंत करणारं अमृत ठरतं.ही भेट म्हणजे सक्षमच्या जादूगर व किमयागार समुपदेशिका आरती चौधरी यांच्या साठी खऱ्या अर्थाने दिवाळीचा सर्वात सुंदर आनंद ठरली!


