भुसावळ(प्रतिनिधी ) – अनेक दिवसापासून जळगाव जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती.मात्र पावसाने कमबॅक करत जळगाव जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने पाण्याच्या पातळीत पुन्हा मोठी वाढ झाल्याने हतनूर धरणाचे १४ दरवाजे १ मीटर ने उघडण्यात आले आहेत.

गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे पुनरागमन झाले असून मागच्या दोन दिवसात जळगाव जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच जिल्ह्यातील महत्वाच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची अवाक वाढली आहे. यामुळे आज रविवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळी हतनूर धरणाचे १४ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आल्यामुळे तापी नदी पात्रात २८ हजार १७५ क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आला. यामुळे तापी नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


